22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरपंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा : भरणे

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा : भरणे

एकमत ऑनलाईन

सोलापूर : राज्य शासनाने सन २0१४ मध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी एक हजार ९७.८९ कोटीचा आराखडा मंजूर केला. त्याअंतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील शंभर कामांसाठी ४७४ कोटी १३ लाखांची तरतूद करण्यात आलेली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली ५१ कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून पंढरपूर येथे येणा-या भाविकांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम, वने, पशुसंवर्धन व दुग्धविकास, मृद व जलसंधारण व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, पुढील महिन्यात आषाढी यात्रेनिमित्त लाखोच्या संख्येने पंढरपूरमध्ये येणा-या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळतील यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम केले पाहिजे. या विकास कामात अडचणी असतील तर संबंधित विभाग प्रमुखांनी थेट संपर्क साधावा. त्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

यावेळी भरणे यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार प्रस्तावित शंभर तसेच त्यातील पूर्ण झालेल्या ५१ कामांची माहिती घेऊन प्रगतीपथावरील १0 कामांचा सविस्तर आढावा घेतला. ही कामे तात्काळ मार्गी लावावीत. तसेच पोलिस विभागाने आषाढी यात्रेदरम्यान लाखोच्या संख्येने येणारे भाविक यांच्यावर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंढरपूर शहरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या