24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसोलापूरचुकीच्या कर आकारणीचा नागरिकांना फटका

चुकीच्या कर आकारणीचा नागरिकांना फटका

एकमत ऑनलाईन

सोलापूर : महापालिका सभागृहात झालेल्या ठरावाला शासनाची मान्यता न घेता ठरावानुसार १५ टक्­के घसारानुसार महापालिकेने चुकीची करआकारणी केली. परिणामी महापालिका प्रशासनाला १३ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ‘कॅग’ने ऑडिटमध्ये ठेवला आहे. याबाबत मुंबईतील सुनावणी पुढे ढकलली असली तरी ही रक्­कम नागरिकांकडूनच वसूल करण्यात येणार आहे.

शहरातील मिळकतींचे करपात्र मूल्य ठरविताना नियम सातमधील तरतूद एक नुसार जमिनीच्या अथवा इमारतीच्या भाडे रकमेतून १० टक्­के घसारा वजा करून जी काही रक्­कम येईल, त्यावरून करमूल्य निश्­चित केले जाते. परंतु, १९७० मध्ये सभागृहात करपात्र मूल्य ठरविताना १० टक्­क्­यांऐवजी १५ टक्­के घसारा धरण्याचा ठराव झाला. या ठरावाला महापालिकेने शासनाची मान्यता घेतली नाही. नव्या मिळकतींच्या नोंदी घेताना १५ टक्­के घसारानुसार कर आकारणी केली.

सन २०११ मध्ये महापालिकेत प्रथमच झालेल्या ‘कॅग’च्या ऑडिटमध्ये ही बाब निदर्शनास आली. ‘कॅग’च्या ऑडिटमध्ये सोलापूर महापालिकेची करप्रणाली चुकीची असून गेल्या ४५ वर्षांपासून याच पध्दतीचा अवलंब केल्याचा ठपकाही ठेवला. ‘कॅग’ने नोंदविलेल्या आक्षेपावरून २०१६ मध्ये महापालिका प्रशासनाने करामध्ये दुरुस्ती केली. परंतु, मागील ४५ वर्षांत झालेल्या चुकीच्या कर पध्दतीमुळे महापालिकेचे १३ कोटी ५६ लाख रुपयांचे झालेले नुकसान कशापध्दतीने भरून काढणार, याला जबाबदार कोण, असे ताशेरे ओढले आहेत. याबाबत मुंबईत सुनावणी होणार होती. ती पुढे ढकलणयात आली. मात्र नुकसानीचा भूर्दंड नागरिकांच्या माथी राहणार आहे. यामुळे चूक महापालिकेची, भोग नागरिकांच्या माथी अशीच परिस्थिती यावरून दिसून येते.

या कालावधीत नोंद घेतलेल्या सर्व मिळकतदारांना नियमित बिलासह पुरवणी बिले देणार नागरिकांकडून १३ कोटी ५६ लाख वसूल करणयात येणार १५ टक्­के घसारानुसार झालेल्या करआकारणीमुळे महापालिकेचे १३ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासाठी शुक्रवारी मुंबईत सुनावणी होती. ती पुढे ढकलण्यात आली. शासनाकडे हा ठराव विखंडीत केला जाईल. परंतु ही रक्­कम नागरिकांकडूनच वसूल करावी लागणार आहे असे सहायक आयुक्­त श्रीराम पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या