सोलापूर : चारित्र्याच्या संशय आणि आमच्या घरात राहायचे नाही या कारणावरून सासरी छळ केल्याने एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चळे (ता. पंढरपूर) येथे रविवारी (ता. २२) पहाटेच्या सुमारास घडली.
आरती नवनाथ शिखरे (वय २१ रा.चळे) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती नवनाथ शिखरे, सासू जनाबाई शिखरे,धनाजी शिखरे(दीर),आणि त्याची पत्नी उज्ज्वला धनाजी शिखरे (सर्व रा.चळे) या चौघाविरुद्ध पंढरपूर तालुक्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरती शिखरे हिने रविवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या संदर्भात आशा बालाजी कांबळे (रा.कासेगाव रोड, पंढरपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. पुढील तपास सहायक निरीक्षक ओलेकर करीत आहेत.