37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसोलापूरनगरपंचायत निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांनी राखले गड

नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांनी राखले गड

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ५ महत्वाच्या नगरपंचायत निवयणकत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रसेने यश मिळवले असून शिवसेनेला मात्र म्हणावेसे यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. माळशिरस नगरपंचायतीमध्ये मोहिते-पाटील गटाने भाजपचे वर्चस्व राखले तर माढ्यात काँग्रेसने आणि वैराग, श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

जिल्ह्यातील वैराग, माढा, नातेपुते, माळशिरस व श्रीपूर- महाळूंग नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये वैराग, श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर माढ्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले. माळशिरस नगरपंचायतीत मोहितेपाटील समर्थकांनी बाजी मारली. त्याठिकाणी भाजपला यश मिळाले. नातेपुते नगरपंचायतीत मोहितेपाटील समर्थक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी वर्चस्व मिळविले.

माळशिरस नगरपंचायतीत भाजपला १० जागा मिळाल्या. राष्ट्रवादीने दोन, महाविकास आघाडी पॅनलने दोन, अपक्षांनी तीन जागा काबिज केल्या. नातेपुते नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान झाले होते, त्याठिकाणी मोहिते-पाटील समर्थक बाबाराजे देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारली. वैराग या नवीन नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांचे वर्चस्व कायम राहिले. महाळूंग-श्रीपूर या नव्या नगरपंचायतीतही राष्ट्रवादीने सहा, काँग्रेस व भाजप प्रत्येक एक आणि स्थानिक आघाडीचे भिमराव रेडे-पाटील यांच्या गटाला पाच तर नानासाहेब मुंडफने यांच्या गटाला चार जागा मिळाल्या.

आता त्याठिकाणी स्थानिक आघाडीच्या नेत्यांवर सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. माढा नगरपंचायतीत सत्ताधारी साठे गटाने १२ जागा मिळविल्या. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, शिवसेनेसह अपक्षांना तीन जागा मिळाल्या. प्रभाग एकमध्ये अजिनाथ राऊत व त्यांची पत्नी सुनिता राऊत यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे पाचही नगरपंचायतीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. राज्यातील या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप पुढे तर काँग्रेस व सेना मागे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या