24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरपंढरपुरात ‘४० गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’ थाळीची चर्चा

पंढरपुरात ‘४० गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’ थाळीची चर्चा

एकमत ऑनलाईन

सांगोला : मार्केटिंगसाठी कायपण हे आपण नेहमीच पाहत आलो आहोत. अशीच एक भन्नाट कल्पना शिवसेनेच्या पदाधिका-याने मार्केटमध्ये आणली आहे.

सोलापुरातील शिवसेना पदाधिका-याने दोन थाळ्या ग्राहकांसाठी आणल्या. या थाळ्यांची नावे ऐकली तर नक्कीच त्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल. कारण या थाळ्या राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन प्रेरित आहेत.
यातील एका थाळीचे नाव आहे ‘४० गद्दार’ तर दुस-या थाळीचं नाव आहे ‘५० खोके एकदम ओके’. यातील ‘४० गद्दार’ ही शाकाहारी तर ‘५० खोके एकदम ओके’ ही मांसाहारी थाळी आहे.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे हॉटेल शिवम इथे या भन्नाट नावाच्या थाळ्या जेवणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ‘४० गद्दार’ थाळी ही अवघ्या ४० रुपयांना तर ‘५० खोके एकदम ओके’ ही मांसाहारी थाळी फक्त ५०रुपयात ठेवण्यात आली आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु आता राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर आलेल्या या दोन थाळ्या सध्या सर्वत्र चर्चेत येऊ लागल्या आहेत.
राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना सातत्याने गद्दार म्हणून हिणवले गेले. याच ४० आमदारांच्या नावाने ‘४० गद्दार’ ही शाकाहारी थाळी तयार झाली.

तर विधानसभेच्या आवारात ‘५० खोके एकदम ओके’ नावाने झालेल्या घोषणावरुन अनोखी मांसाहारी थाळी तयार करण्यात आली आहे.
सांगोला रस्त्यावर असलेल्या दत्तात्रय यादव आणि बंडू घोडके यांच्या हॉटेल शिवमवर ही थाळी सध्या उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे ह्या थाळीचीकिंमत ४० रुपये आणि ५०रुपये अशी ठेवण्यात आली आहे. पंढरपूर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय घोडके यांच्या संकल्पनेतून ही थाळी निर्माण करण्यात आली आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या