21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home सोलापूर सोलापूर ग्रामीणमध्ये १७४ कोरोनाबाधित रुग्ण तर शहरात ५३ नवे बाधित

सोलापूर ग्रामीणमध्ये १७४ कोरोनाबाधित रुग्ण तर शहरात ५३ नवे बाधित

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आज नव्याने 174 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज एक हजार 282 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एक हजार 108 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 174 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय आज सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज करमाळ्यातील बागवान नगर येथील 48 वर्षाची महिला, उपळाई रोड बार्शी येथील 45 वर्षांचे पुरुष, गांधी रोड पंढरपूर येथील 54 वर्षाची महिला, उत्पाद गल्ली पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, फुलंिचचोली (ता. पंढरपूर) येथील 53 वर्षाचे पुरुष, माढा तालुक्­यातील रिधोरे, येथील 70 वर्षाची महिला, तांदुळवाडी येथील 80 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ग्रामीणमध्ये 220 इतकी झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात आत्तापर्यंत सात हजार 878 जण बाधित झाले आहेत. अद्यापही दोन हजार 860 जण रुग्णालयात उपचार घेत असून चार हजार 798 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

मोहोळ तालुक्­यातील खवणी, मोरवंची, पाटकूल, समर्थनगर, शिरापूर, वाफळे, बार्शीतील आडवा रस्ता, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, कोर्टाच्या पाठीमागे, भीमनगर, चारे, चिखर्डे, दत्तनगर, गाडेगाव रोड, हनुमान रोड, कापसेवाडी, खडकोणी, कोरफळे, कुर्डुवाडी रोड, परांडा रोड, ंिरग रोड, सनगर गल्ली, शेळगाव, श्रीपत ंिपपरी, सिद्धार्थनगर, झाडबुके मैदान, माढा तालुक्­यातील बेंबळे, कुर्डूवाडी, मिटकलवाडी, परिते, रांझणी, श्रीरामनगर माढा, मंगळवेढा तालुक्­यातील आंधळगाव, बोराळे, मरवडे, सलगर बुद्रुक, माळशिरस तालुक्­यातील अकलूज, दहिगाव, महाळूंग, माळीनगर, मांडवे, संग्रामनगर, उघडेवाडी, यशवंतनगर, उत्तर सोलापूर तालुक्­यातील मार्डी व डोणगाव, पंढरपुरातील अनिल नगर, बादलकोट, भटुंबरे रोड, भोसे, चंद्रभागा घाट, चौफाळा, दाळे गल्ली, फुलंिचचोली, घोंगडे गल्ली, गुरुकृपा हौंिसग सोसायटी, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कडवे गल्ली, कासेगाव, काशीकापड गल्ली, खर्डी, कोळी गल्ली, क्रांतीचौक, मुंडेवाडी, नेमतवाडी, पोलिस लाईन, रोपळे, सरकोली, शिवरत्न नगर, शेळवे, सोनाजी महाराज मठ, सोनके, सब जेल, तन्हाळी, तारे गल्ली, उमडे गल्ली, सांगोला तालुक्­यातील चिकमहूद, ढाळेवाडी, महुद शिवणे, वाडेगाव, दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे, बोरामणी, फताटेवाडी, हत्तरसंग, नवीन विडी घरकुल, अक्कलकोट मधील समर्थ नगर व तहसील ऑफिसजवळ या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात ५३ नवे बाधित; एकाचा मृत्यू
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री १२ पर्यंत १२९ वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७६ अहवाल निगेटिव्ह आले असून ५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात २७ पुरुष तर २६ महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी दिली आहे. आज २१ बाधित व्यक्ती बरे होऊन घरी गेल्या आहेत.

ज्या वेगाने सोलापूर शहर आणि परिसर बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे मृत्यूचे कमी होताना दिसत आहे.आज मात्र नवीन ५३ रुग्ण आढळले आहेत. मोठ्या प्रमाणावर शहर परिसरात कोरोना टेस्ट करण्याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार टेंिस्टग होत आहे परंतु, अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेंिसग आणि तपासणी प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.जेणेकरून, कोरोनाची साखळी तोडण्यात सोलापूरकर यशस्वी होतील.

आज एक कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज पर्यंत एकूण ३९२ जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये २६२ पुरुष तर १३० महिलांचा समावेश होतो.आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ५९५१ इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १०३४ इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या ४५२५ इतकी लक्षणीय आहे.

गणेशोत्सवात सांस्कृतिक ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या