24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मुळेगाव तांडा (ता. द. सोलापूर) हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईत वातानुकूलित कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. यात अटक करण्यात आलेली व्यक्ती फरार आरोपी असून, त्याच्याकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सोलापूर, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांना, ५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास, मुळेगाव तांडा येथील स्वामी विवेकानंदनगर (ता. द. सोलापूर)च्या हद्दीत एका चारचाकी कारमधून गोवा विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कने सापळा रचला. त्यानुसार चारचाकी एमएच १२ सीके ८६९५ या वाहनामध्ये गोवा राज्यनिर्मित व विक्रीस असलेले विदेशी मद्य अवैध विक्रीकरिता फरार आरोपीने त्याच्या ताब्यात बाळगून त्याचा साठा केला होता.

या प्रकरणी वाहन जप्त करून फरार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूची किंमत ३ लाख ४८ हजार रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात एक चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गाडीची तपासणी केली असता गाडीत विदेशी मद्याचे असे एकूण ४८ बॉक्स व विविध ब्रँडची एकूण ५०० लेबल्स आढळून आली. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या