22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसोलापूरशहरात ओळखीचा बहाणा करून पैसे लुटण्याचे प्रमाण वाढले

शहरात ओळखीचा बहाणा करून पैसे लुटण्याचे प्रमाण वाढले

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दोन दिवसांपूर्वी जोडभावी पेठेतील गोविंद गुर्रम ७९ वर्षीय आजोबांकडून काहींनी गोड बोलून तीन हजार रुपये नेले. शेजार्‍यांनी वाळू मागविली आहे. त्यांचा फोन लागेना. त्यांनी तुमच्याकडून तीन हजार रुपये घ्यायला सांगितले, असे बोलून अनोळखी नागरिकांनी त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेतले शेजाऱ्यांना याबाबत विचारल्यावर त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आजोबांना या घटनेचा धक्का बसला. पैसे देताना मी भानावरच नव्हतो, असे गुर्रम आजोबांनी सांगितले. ओळखीचा बहाणा करून पैसे लुटण्याच्या काही घटना घडल्या आहेत.

अशीच घटना मागील पंधरा दिवसांपूर्वी जुना घरकुल येथील कोटानगरात घडल्याचे गोविंद गुर्रम यांच्या सूनबाई श्यामल यांनी सांगितली. माझ्या चुलत सासू उमा गुर्रम या अर्धांगवायू आजाराने त्रस्त असून, त्यांच्या आजाराचा फायदा घेऊन एका अनोळखी व्यक्तीने एक हजार रुपयांची फसवणूक केली आहे. आयुर्वेदिक औषध आणून देऊ, असे सांगून एक हजार रुपये घेतले. सोबत मोबाइलही घेऊन ते पळाले.

शास्त्रीनगरात कुरापाटी नामक किराणा दुकानदारच्या नातेवाइकांनी सांगितले, त्यांच्या घरात एक व्यक्ती आजारी होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानासमोर दोन अनोळखी इसम आलेले. त्यांनी त्या व्यक्तीकडे पाहत या आजारावर आमच्याकडे औषध आहे. तुम्ही सात हजार रुपये द्या. तुम्हाला औषध देऊ असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवत घरातील ज्येष्ठांनी त्यांना सात हजार रुपये दिले. दहा मिनिटांत औषध आणून देऊ. असे सांगून त्या दोघांनी तिथून पळ काढला. अनोळखी नागरिकांकडून पैसे लुटण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या