32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeसोलापूरमाळढोक अभयारण्य नावालाच

माळढोक अभयारण्य नावालाच

एकमत ऑनलाईन

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील माळढोक अभयारण्य केवळ नावालाच शिल्लक राहिले आहे. या अभयारण्यात माळढोक दिसत नसल्यामुळे सोलापूरची ही ओळख विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळामध्ये पर्जन्यमान म्हणावा त्या प्रमाणात झाला असला तरी पाण्याचे योग्य नियोजन नसल्या कारणामुळे, वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरीही प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन वन्य जीवाचे रक्षण करण्यासाठी लागणारे योग्य ती काळजी, योग्य त्या वेळी घेतल्यास अभयारण्यामध्ये असलेले वन्यजीव म्हणजेच माळढोक लांडगा कोल्हे ससे हरीण यासोबत इतर वन्य पशु पक्षी यांच्या जीवितास होणारा धोका टळेल.

त्यामुळे अभयारण्यातील पशु पक्षाचा जीव वाचण्यास मदत होईल त्यामुळे मानवी जीवितास असणारा संभाव्य धोका टळण्यास मदत होईल. तसेच नान्नज अभयारण्या जवळील असलेल्या खेड्यापाड्यातून शिकारी करणारे लोक यांचा रात्री-अपरात्री ससे हरीणकिंवा इतर पक्षी त्यांची शिकार केली जात असल्याकारणाने या प्रजाती प्रामुख्याने आपणास कमी झालेल्या पाहावयास मिळत आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित शिकारीवर योग्य वेळी योग्य ती कारवाई केल्यास निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल. जवळपासच्या खेड्यातून वाढते शहरीकरण पाहता औद्योगिक वसाहतीसाठी व वाढती संख्या त्यामुळे वृक्षांची मुबलक प्रमाणात तोड होत असल्याने वन्य जीवच्या प्रोजो उत्पादनासाठी पोषक असे वातावरण नसल्यामुळे देखील वन्यजीवांचे घट झालेली आपणास पहावयास मिळते.

तसेच मार्च महिन्याचा पहिला आठवडा असतानादेखील तापमान वाढत चाललेले पाहता एप्रिल आणि मे महिन्याच्या उन्हाळा कडक असल्याचे संकेत जाणवत आहेत तरीही अभयारण्यामध्ये असलेल्या वन्यजीवांना व पक्षांना आवश्यक असणारे पिण्याचे पाणी जवळ च्या खड्ड्यामध्ये व झाडांना लटकवून जर पशुपक्षी प्रेमी ने ठेवले तर वन्यजीव वाचण्यास मदत होईल.

… म्हणे, अभयारण्य कशाला?
अभयारण्यात माळढोक दिसला नाही तर अभयारण्य कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माळढोक या परिसरात दिसत नसला तरी तो येणारच नाही अशी परिस्थिती नाही, तसेच अभयारण्याला नाव माळढोकचे असले तरी येथे कोल्हा, लांडगा, काळवीट, घोरपड आणि इतर प्राणी व पक्षी आहेत, त्यामुळे अभयारण्य नको असे म्हणणे उचित होणार नाही. येथील जमिनीसाठी काही लोक अपप्रचार करीत असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे.

लवकरच मदरशांमध्ये घुमणार रामायण,भगवद्गीतेचे सूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या