32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeसोलापूरपंतप्रधान आवास योजनेत सोलापुरात घर मिळते 2 लाख 75 हजार रुपयांत मग...

पंतप्रधान आवास योजनेत सोलापुरात घर मिळते 2 लाख 75 हजार रुपयांत मग पंढरपुरात घर 5 लाख 50 हजार रुपयांना का ?

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर शहरात सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचीकिंमत ही बाजारभावापेक्षा ही जास्त आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणून बांधण्यात येणा-या या योजनेच्या मुख्य उद्देशालाच पंढरपूर नगरपालिकेने तिलांजली दिली आहे. 305 स्क्वेअर फुटाचे घर 8 लाख 50 हजार रूपयांना देण्यात येणार आहे. म्हणजेच 2786 रू. प्रति स्क्वेअर फुट दराने दुर्बल घटकांना हे घर देवून आपण नक्की काय साध्य करणार आहात. रू.2786 प्रति चौ.फुट हा दर पंढरपुरातील इतर खाजगी इमारतीच्या ठिकाणी सुध्दा नाही. मात्र नगरपालिकेच्या मालकीची जागा असून सुध्दा पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचीकिंमत 8 लाख 50 हजार रूपये ठरविण्यात आली आहे.

सोलापूर शहरात देखील अटल गृहनिर्माण सहकारी संस्था दहिटणे या संस्थेने फक्त 2 लाख 75 हजार रूपयांत 1 बीएचके घर जागा देणार असल्याची जाहिरात देखील केलेली आहे. तरी पंढरपूरातील सर्वसामान्यांना कमी दरात घरे देण्यात यावीत. तसेच सदरच्या दरांमुळे श्रीमंतांना देण्यात येणा-या दरामध्ये गोरगरीबांना घरे देणार असल्याचे सांगून त्यांची पिळवणूक केली जात आहे अशी चर्चा आता पंढरपूरात ऐकावयास मिळत आहे. आणि राहिला प्रश्न 2 लाख 50 हजार रूपये पंतप्रधान अनुदान योजनेचा तर ते कोठेही घर बांधले तरी मिळते मग पंढरपूर नगरपालिकेच्या या योजनेमध्ये कमी दरात घर मिळते असे का भासविण्यात आले आहे. तरी त्याचे दर कमी करण्यात यावे याबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. यावेळी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सागर कदम उपस्थित होते.

वास्तविक पाहता पंढरपूर शहरात यापुर्वी अडीच वर्ष सोडले तर 20 ते 25 वर्ष सत्ता आपल्या म्हणजे आंदोलनकर्त्यांच्या घरात पाणी भरते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या नगरपालिकेच्या सत्तेच्या काळात तत्कालीन व आत्ताचे ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळेच आपल्याला पंढरपुरात जलतरण तलाव बांधण्यासाठी 1.5 कोटी रुपये निधी मिळाला होता तो कसा खर्च करून उभारला गेला त्याची आजची परिस्थिती काय आहे हे आपण विसरला आहात काय ? जे उपजिल्हा रुग्णालय म्हणजेच केवळ जिल्हा रूग्णालयाचा दर्जा असलेले कॉटेज हॉस्पिटल उभा केले त्यात पंढरपूर शहरातील किती नागरिक त्या रुग्णालयात जाऊन लाभ घेतात हा एक संशोधनाचा विषय आहे.

जो गुजराथी समाज गेली 100 वर्षांपासून आपला मैल डोक्यावर घेऊन वाहत आला त्या समाजाला आपण अडीच एकर जागेची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे तो समाज वारंवार करत आहे त्याला आपण न्याय का देऊ शकलो नाही याचे आत्मंिचतन करण्याची गरज आहे. शहरातील अनेक रस्ते तयार झाले त्यांची आज काय अवस्था आहे पहावे मगच दुस-याला दोष द्यावा. तसेच चेहरे पाहून अतिक्रमणे काढली गेली आणि आपल्या बगल बच्चाची अतिक्रमणे तशीच ठेवली ही वस्तुस्थिती का नाकारत नाही. त्याचबरोबर सोलापूर शहरातील प्रधान आवास योजनेचे घर 2 लाख 75 हजार रुपयांत मिळते मग आपल्या पंढरपूर शहरात असे काय नवीन केले आहे की तेवढ्याच बांधकामाची जादाकिंमत घेवून पंढरपूरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घर 5 लाख 50 हजार रुपयांना का ? पंढरपूरचे नागरिक सर्वसामान्य नाहीत का ? असा खडा सवाल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे यांनी केलेला आहे.

जामगा शिवणी प्रकरणी लोह्यात कडकडीत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या