31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeसोलापूरकोवीड हॉस्पिटलचे आज उद्घाटन

कोवीड हॉस्पिटलचे आज उद्घाटन

एकमत ऑनलाईन

अकलूज :  माळशिरस तालुक्यातील १५० डॉक्टरांच्या सहकार्यातून अकलूज येथे १०० बेडचे सुसज्ज कोवीड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयंिसह मोहिते-पाटील व पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते होणार आहे.

हे हॉस्पिटल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार व दर प्रणालीनुसार चालविण्यात येणार आहे. तालुक्यातील डॉ. एम. के. इनामदार, विवेक गुजर, समिर बंडगर, अतुल फडे, समिर दोशी, श्रीकांत हेगडे, सुनिल नरूटे, सचिन सावंत, भुषण चंकेश्वरा, गायकवाड, श्रीकांत देवडीकर या १५ फिजीशियन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली इतर प्रत्येकी १० डॉक्टर अशा १५ टिम २४ तास हे हॉस्पिटल चालवणार आहेत.

या हॉस्पिटलसाठी नर्सिंग स्टाफ सहारा व शिवरत्न शिक्षण संस्था पुरवणार आहे. तर ग्रामपंचायत अकलूज सफाई कामगार देणार आहेत. येथे काम करणार्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफ चा शासन ५० लाख रूपयांचा विमा उतरणार आहे. उद्घाटन प्रसंगी आ. रणजितंिसह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, नितीन करीअर, धेर्यशील मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजंिसह मोहिते-पाटील, पं. स. सभापती शोभा साठी, पं. स. उपसभापती अर्जुनसह मोहिते -पाटील, प्रांत अधिकारी शमा पवार, तहसिलदार अभिजित पाटील, डॉ. रामचंद्र मोहिते उपस्थित राहणार आहेत.

कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला जाणवला श्वसनाचा त्रास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या