22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरधाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन

धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : देशातील पहिल्या धाराशिव साखर कारखान्याच्या अक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व्हर्चुअलद्वारे करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, उस्मानाबाद पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदास ओमराजे निंबाळकर, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार कैलास पाटील, शिखर बॅकेचे चेअरमन विद्याधर आनासकर, सदस्य अविनाश महागांवकर, जिल्हाधिकरी कौस्तुभ दिवेगावकर साहेब,श्रक चे एस.व्ही.पाटील, मौज इंजिनीअरिंगचे ओक, कागवाड, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत व्हर्चुअल पद्धतीने उदघाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की देश कोरोनाच्या अडचणीचा सामना करत असताना, पुढची लाट देशाच्या उंभरट्यावर आली असताना केवळ ऑक्सिजन हेच कोरोना वरील औषध आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की चेअरमन अभिजीत पाटील यांनी आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला यासाठी लागणारे सर्व सामग्री त्यांनी १८ दिवसा त पूर्ण करून दाखवली त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ऑक्सिजनचा शोध घेण्याचा मार्ग सापडला धाराशिव साखर कारखाने पहिली बाजी मारली यासाठी ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे. पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले की उस्मानाबाद जिल्ह्यात होत असलेल्या ह्या देशातील पहिल्या इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

ज्यावेळी सर्व कारखानदारांची व्हि एस आय मध्ये बैठक झाली. त्यावेळी देशाचे नेते शरद पवार यांनी केलेल्या अवाहनानुसार त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी हा प्रकल्प उभा करण्याचं धाडस दाखवलं. मी माझ्या कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून मौज इंजिनिअंिरग तसेच व्ही एस आय च्या टेक्निकल सपोर्टमुळे व माझ्या संचालक मंडळ व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहका-यांने केवळ १८ दिवसात हा प्रकल्प उभा केला असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.

के.पी. शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या