23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरसोलापुरात कोरोनाने विळखा आवळला

सोलापुरात कोरोनाने विळखा आवळला

कोरोनाग्रस्तांची संख्या ४६१ तर मृत्यू ३२

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या १२६ जणांच्या अहवालानुसार पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या विषाणुजन्य आजाराने सोलापुरातही चांगलेच पाय पसरायला सुरुवात केली आहे. बुधवारी १२६ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, एक पुरुष व एक स्त्री असा दोघांचा मृत्यू झाला. सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आता ४६१ वर पोहचली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत ४४७८ जणांची चाचणी करण्यात आली यात ४२७० त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून १६५ जणांनी कोरोना वर मात केली आहे. सोलापूर शहरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतानाच एका मटण विक्रेत्याला करोनाची लागण झाली आहे.

सोलापूर शहरातील मोरारजी पेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठ दिवसात त्या रुग्णाचा तीनशेच्या आसपास ग्राहकांशी संपर्क आला आहे. त्यामुळे अनेक जणांना मटण खाणे महागात पडले आहे. किती जणांना लागण झाली आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित रुग्णाचा मटण आणि चिकन सेंटरचा व्यवसाय आहे .शहरातील बरÞ्याच व्यापारÞ्यांनी मांसाहारी सेंटर बंद केले असल्यामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणाहून ग्राहक येत होते. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत बंद करायला सांगितले होते, पण तरीही हा रुग्ण ग्राहकांना चिकन, मटण घरून पुरवठा होत होता. संबंधित रुग्णाचा तीनशेच्या आसपास ग्राहकांशी संपर्क आला असल्याचे बोलण्यात येत आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आठ दिवसात कोणत्या ग्राहकांशी संपर्क आला त्याची माहिती घेण्याचे काम प्रशासन करीत आहे . सोलापूर शहरातील महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णांच्या घरातील सदस्यांना ताब्यात घेतले आहे व इतर नागरिकांचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. आजपर्यंत ४७४३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४६१२ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. अजून १३१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालपैकी ४५६ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी दिली.

Read More  परभणी जिल्ह्यात आणखी ९ नवे कोरोनाग्रस्त
Read More चीनचा झाला तिळपापड म्हणे….भारत हा चीनला पर्याय होऊ शकत नाही

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या