प्रशासनाची शिकस्त : शहरात कोरोनाचे १६५४ रु ग्ण बाधीत, १३९ मृत
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून शहरात १६५४ रूग्ण बाधीत असून मृतांची संख्या १३९ वर पोहोचली आहे़ तर ८२५ जण कोरोनामुक्त झाले असून ६९०जणांवर उपचार सुरू आहेत़ आतापर्यंत ९५०० जणांची तपासणी करण्यात आली़ त्यातील ९३३० जणांचे अहवाल प्राप्त झाले़ निगेटीव्ह अहवाल ७६७६ असुन १६५४ रूग्ण पॉझिटीव्ह आहेत.
जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले असून मंगळवारी नवे सहा रूग्ण आढळले़ दक्षिण सोलापुर तालुका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णामध्ये आघाडीवर राहिला आहे़ सोलापुर शहरापासून जवळ असलेल्या विडी घरकुलमध्ये मोठया प्रमाणात रूग्ण आढळु लागल्याने ही आकडेवारी वाढली आहे़ त्याखालोखाल बार्शी, अक्कलकोटचा क्रमांक लागत आहे़ दररोज रूग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागावरचे टेंशन वाढत चालले आहे़ १३९ रूग्णापैकी ११ जणांचा मृत्यू तर ६० जण उपचारानंतर घरी परतले असून सध्या रूग्णालयात ६८ जण उपचार घेत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने ६ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये ४ पुरुष, २ स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . आज २ तर आतापर्यंत ६० रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १३९ कोरोनाबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये नवीन विडी घरकुल १, भोजप्पा तांडा उत्तर सोलापूर १,लिंबी चिंचोळी १, हंजगी तालुका अक्कलकोट १, होटगी तालुका दक्षिण सोलापूर २ इतके रुग्ण आढळले आहेत. आज 53 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 6 पॉझिटीव्ह तर 47 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप १४ अहवाल प्रलंबित आहेत. १३९ रुग्णांपैकी ८५ पुरुष ५४ स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण बरे होऊन घरी गेली आहेत.
Read More बारामतीत राजू शेट्टींनी घेतली शरद पवार यांची अचानक भेट