21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरव्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा - ना. अमित देशमुख

व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा – ना. अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ( सिव्हिल हॉस्पिटल) व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. ही संख्या एकूण बेडच्या संख्येच्या पंचवीस टक्के असायला हवी. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी येथे दिल्या. कोरोना विषाणू संसर्गाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. देशमुख यांनी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर उपस्थित होते.

श्री. देशमुख यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र आपण तयारीत रहायला हवे. तिसरी लाट येणार हे ग्रहीत धरुन तयारी करायला हवी. त्यासाठी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. त्याचबरोबर बालकांच्यासाठी तयारीचे नियोजन करा. ग्रामीण भागातील शासकीय दवाखान्यात व्हेंटिलेटर, बायपैप मशीन, ऑक्सिजन बेड याची तयारी करा. आता संसर्ग कमी होत असल्याचे दिसत असले तरी चाचण्यांची संख्या कमी होऊ देऊ नका. आरटीपीसीआर चाचण्यावर भर द्या. गरज भासल्यास प्रयोगशाळा संख्या वाढवा. त्याचबरोबरीने कॉंटैक्ट ट्रेसिंग वाढवा. फ्रंटलाईन वर्करच्या तपासणी वारंवार करा, त्यांचे लसीकरण करुन घ्या, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. प्रथम वर्ग आणि व्दितीय वर्ग पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जातील. अधिष्ठाता स्तरावरील भरावयाच्या पदांसाठी लवकरात लवकर प्रक्रिया सुरु करा, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या. यावेळी डॉ. ठाकूर यांनी सादरीकरण केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध ंिपपळे, डॉ. पुष्पा अगरवाल, डॉ. रोहन खैराटकर आदी उपस्थित होते.

तिस-या लाटेला सक्षमपणे सामोरे जाऊ : ना. अमित देशमुख
सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रादुर्भाव कमी झाला ही समाधानकारक बाब आहे, मात्र तिस-या लाटेची शक्­यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणा आवश्­यक पूर्वतयारी करीत आहे. लस उपलब्ध झाल्यास जिल्ह्यात 100 दिवसांत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची आहे. तिस-या लाटेत प्रामुख्याने लहान मुलांना प्रादुर्भावाची जास्त शक्­यता असल्याचा तर्क आहे. त्यादृष्टीने आवश्­यक तयारी करून महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे तिस-या लाटेला सामोरे जाणार आहे. कोविडच्या तिस-या लाटेत लहान मुलांना कोविडच्या प्रादुर्भावाची शक्­यता विचारात घेऊन 12 ते 18 वयोगटासाठी काही देशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. यास जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्यास केंद्राच्या परवानगीनंतर राज्यात या वयोगटासाठी लस देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहर-जिल्ह्यातील कोविडची स्थिती जाणून घेण्यासाठी अमित देशमुख सोलापूर दौ-यावर आले होते. डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये आढावा बैठक घेतल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लहान मुलांना कोविड उपचारासाठी शासकीय रुग्णालयातील 100 बेड आरक्षित ठेवण्यात येणार असून यामध्ये 256 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील लहान मुलांवर उपचाराची सोय राहणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील रिक्­त पदांची भरती करण्यात येणार आहे. अधिष्ठाता स्तरावर पदे भरण्यात येतील. अन्य पदे परीक्षा घेऊन तसेच एमपीएससीमार्फत भरली जातील. लॉकडाउमुळे वैद्यकीत परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. आता या परीक्षा कोविड नियमांचे पालन करून घेण्याची तयारी करण्यात येत आहे, असे या वेळी देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुस-या लाटेत महाविकास आघाडी सरकारने चांगल्या उपाययोजना केल्याने कोरोना लवकर नियंत्रणात आले. याविषयी महाविकास आघाडीचे कौतुक केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पातळीवर होत आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पाश्र्­वभूमीवर महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभे राहणार आहे, पण याकामी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे, असेही देशमुख म्हणाले.

लातूर जिल्ह्यातील दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या