27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसोलापूरबार्शीत ३१ जुलैपर्यंत वाढीव जनता कर्फ्यू : प्रांताधिकारी निकम

बार्शीत ३१ जुलैपर्यंत वाढीव जनता कर्फ्यू : प्रांताधिकारी निकम

एकमत ऑनलाईन

बार्शी : कोरोना महामारीच्या अनुषंगाने आणि शहराबरोबर तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बार्शी शहरात आणखी ५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी रविवार २६ जुलै रोजी केली. यावेळी निकम यांनी बार्शी शहरातील व्यापा-यांशी संवाद साधला असता व्यापारी वाढीव पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूला तयार असल्याचे निकम यांनी सांगितले.यावेळी निकम यांनी आरोग्य विभाग,पोलिस प्रशासन,बानपा कर्मचारी,ग्रामीण रुग्णालायाचे डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी शहरात गोरगरीब जनता आहे.लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर बेकारीची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी थोड्या वेळ मुभा द्यावी.तसेच ज्यांची आर्थीक बाजू मजबूत आहे त्या लोकांनी महिन्याभराचे किराणा सामान भरले आहे परंतू ज्यांची आर्थीक परिस्थिती नाही त्यांच्याकरिता किराणा दुकानाचे सामान भरण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती प्रांताधिकारी निकम यांच्याकडे राऊत यांनी केली.

यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी देखील पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूला पांिठबा दर्शविला.कोरोना रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे असे सोपल यांनी मागणी केली.यावेळी पोलिस उपअधीक्षक सिद्धेशर भोरे,नूतन आय.ए.एस.अंकित,तहसीलदार कुंभारे, मुख्याधिकारी शिवाजी गवळी,विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे,तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जोगदंड,शितल बोपलकर,व्यापारी संघटने तर्फे सुभाष लोढा,तातेड आदी उपस्थित होते.

Read More  चारठाणा परिसरातील बंधारे ओव्हरफ्लो

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या