25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरसत्तांतर; पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी

सत्तांतर; पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे १ लाख ९ हजार ४५० मते घेत विजयी झाले आहेत.तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी निसटता पराभव झाला आहे. राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहावयास मिळाली.

सुरुवातीस राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. मात्र सातव्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेत सातत्य फिरवली आणि एकदा पीछेहाट झाल्यानंतर भालके हे शेवटपर्यंत आवताडे यांची आघाडी तोडू शकले नाहीत. शेवटच्या फेरी अखेर समाधान आवताडे यांनी १ लाख ९ हजार ४५० मतांनी विजय संपादन केला.यानंतर पंढरपुर आणि मंगळवेढा येथील समर्थकांनी विजय जल्लोष साजरा करत गुलालाची उधळण केली.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनीवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
यामध्ये महाविकास आघाडीचे भगीरथ भालके व भाजपाकडून समाधान आवताडे यांच्यात चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. पण इतर उमेदवारांना जेमतेम एक ते दोन हजार मते मिळणे कठीण झाले होते. सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सातव्या फेरी पर्यंत १००० मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर आठव्या फेरी पासून समाधान आवताडे यांनी २२९५ मतांची आघाडी घेत शेवट पर्यंत आघाडी कायम ठेवत ३८ फेरी अखेरीस १ लाख ९ हजार ४५० मते मिळाली.तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली.

तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे – १६०७, वंचित आघाडीचे बिराप्पा मोटे- ११९६, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे -१०२७, अभिजीत बीचुकले -१३७, सिद्धेश्वर आवताडे – २९५५ यांना मते मिळाली. यामध्ये भाजपचे समाधान अवताडे हे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर झाले. अवताडे यांना पंढरपुर शहर तसेच मंगळवेढा शहर व तालुक्यातुन चांगले मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार,जयंत पाटील, धनंजय मुंडे,शिवसेनेचे गुलाबराव पाटील, उदय सामंत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,प्रणिती शिंदे ,रुपाली चाकणकर तसेच भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील, रणजितसिंह निंबाळकर,भाजपचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर,चित्रा वाघ, सदाभाऊ खोत यांच्या सभा घेण्यात आल्या.

यामध्ये पंढरपुर शहर आणि ग्रामीण भागात आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधून विजयाचे चांगले गणित आखले होते.या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन परिचारक बंधूनी मतदार संघात भाजपचा जोरदार प्रचार केला होता.यामुळे मागील निवडणूकीतील आकडेवारी पाहता परिचारक आणि अवताडे एकत्र आल्याने भाजपाला विजय मिळवता आला. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाणी प्रश्न ,पंढरपुर येथे एम आय डी सीचा प्रश्न, तसेच बेरोजगारी, वाढीव वीज बिल व वीज तोडणीचा मुद्दा,लॉक डाउन मुळे निर्माण झालेला बेरोजगारिचा विषय चांगलाच चर्चेला आला होता.

चिंता कायम, देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या