27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूरअडीच वर्षानंतर धावणार 'इंद्रायणी एक्स्प्रेस'

अडीच वर्षानंतर धावणार ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोरोनामुळे तब्बल अडीच वर्षे जागेवरच थांबलेली पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस (गाडीक्रमांक १२१६९-१२१७०)सोमवार दिनांक १८ जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. पुणे, मुंबईकडे दररोज ये-जा करणाऱ्या सोलापूरमधील चाकरमान्यासाठी ही गाडी अत्यंत महत्वाची मानली जाते. ही रेल्वे सुरु होणार असल्याने सोलापूरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या नोकरदारांसह, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुंबई, पुण्याहून सोलापूरला वेळेत येता येणार आहे.सोलापूर विभागात दुहेरीकरण विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वाशिंबे-भाळवणी २७ किलोमीटरच्या दुहेरीकण, विद्युतीकरणाचे काम सुरू आहे.

हे काम देखील येत्या १८ ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू व्हावी यासाठी प्रवासी आणि प्रवासी संटनाकडून सातत्याने मागणी केली जात होती, अखेर या मागणीला यश
आले आहे. या गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, चाकरमानी प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरते.

सकाळी ६.३० वाजता हुतात्मा एक्स्प्रेस तर सकाळी ११ वाजता उद्यान एक्स्प्रेसनंतर इंद्रायणी हा सुलभ पर्याय असल्याने या गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. इंद्रायणी एक्स्प्रेस दुपारी पुणे येथून सोलापूरला १.२५ वाजता पोहचते तर दुपारी २ वाजता सोलापूर स्थानकावरून मुंबईकडे रवाना होते. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेसने अनेकांचा प्रवास सुलभ होतो.

इंद्रायणी एक्स्प्रेसला पुणे, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी या भागातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची ठरली आहे. त्यामुळेच तिला सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. एकूण १६ डब्यांची ही गाडी असून, आरामदायी आसन व्यवस्था, बायो टॉयलेट्स, जार्जिंग व्यवस्था,सामान ठेवण्यास मोठी जागा या सुविधा नव्या एलएचबी कोचमध्ये देण्यात आले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या