24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeसोलापूरमहूद व भाळवणी परिसरातील कासाळगंगा नुकसानग्रस्त भागाची दिपकआबांकडून पाहणी 

महूद व भाळवणी परिसरातील कासाळगंगा नुकसानग्रस्त भागाची दिपकआबांकडून पाहणी 

आपत्कालीन परिस्थितीत झालेल्या भूतो न भविष्यती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी :दिपकआबांची आग्रही मागणी

एकमत ऑनलाईन

सांगोला (विकास गंगणे) : सलग काही दिवसांपासून आटपाडी म्हसवड सह सांगोला तालुक्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कासाळ ओढा व महूद भाळवणी परिसरातील नद्या-नाले व ओढ्यांना प्रचंड पाणी आले आहे यामध्ये अशा ओढ्यावर असलेले बंधारे फोडून हे पाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीत आणि आणि घरात-दारात घुसले अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे भाळवणी व महूद परिसरातील शेतकर्‍यांच्या डाळींब बागा, ऊस ,शेतातील उभी पिके, दारातील जनावरे, शेळ्यामेंढ्या, पशु पक्षी, यांसह राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त कुटुंबांना शनि 19 रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळावरून दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सदर परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आणि दूरध्वनीवरून उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन ढोले उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उदयसिंह भोसले यांच्याशी संपर्क साधून उध्वस्त झालेल्या  शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत करण्याबाबत त्यांना सूचना केल्या.महूद पळशी सुपली उपरी आणि भंडीशेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांची परिस्थिती दिपकआबांनी जाणून घेतली.

कासाळ ओढ्याचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या आटपाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने अचानक या ओढ्याला प्रचंड पाणी आले होते या ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यात हे पाणी न सामावल्याने बंधारे फोडून हे पाणी चिक-महूद महूद गार्डी पळशी सुपली उपरी भंडीशेगाव वाडीकुरोली आणि शेळवे या ओढ्यालगत असणाऱ्या गावातील शेतात घुसले  यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये डाळिंबाच्या बागा,ऊस,शेतातील उभी पिके, कोंबड्या, शेळ्या मेंढ्या, अक्षरशः वाहून गेली तर राहती घरेही जमीनदोस्त झाली निसर्गाच्या अवकृपेमुळे येथील शेतकऱ्यांवर फार मोठे संकट ओढवले आहे अशा संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील पुढे सरसावले.

त्यांनी प्रत्यक्ष थेट घटनास्थळी जाऊन झालेल्या या नुकसानाची पाहणी केली. अचानक आलेल्या या संकटातून सावरण्यासाठी प्रशासनाने अजिबात दिरंगाई न करता आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील शेतकऱ्यांचे व सामान्य नागरिकांचे झालेले नुकसान पाहता, अशा नुकसानग्रस्त नागरिकांचे तात्काळ पंचनामे करावे व त्यांना तातडीची मदत मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी दिपकआबांनी यावेळी केली यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाला करण्याची तयारी आबांनी दर्शविली

दिपकआबांना पाहून नुकसानग्रस्त महिलांनी फोडला हंबरडा
कासाळगंगा कोपल्याने अचानक निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे या ओढ्यालगत असणाऱ्या अनेक शेतकरी व सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत अशा पीडित कुटुंबियांची सर्वात प्रथम दिपकआबा साळुंखे पाटील यांनी भेट घेऊन त्यांना ना धीर दिला. यावेळी घरे जमीनदोस्त होऊन उध्वस्त झालेल्या महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडून आपल्या नुकसानीची करूण कहानी आबांसमोर व्यक्त केली.आधी पाण्याचा महापूर व नंतर या महिलांच्या अश्रूंचा महापूर अशा भावनिक प्रसंगी उपस्थितांची मनेही हेलावून गेली होती

दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या