25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeसोलापूर२८ वर्षीय युवकाचा प्रेरणादायी प्रवास; नर्सरीतून ४० लाखांची वार्षिक उलाढाल

२८ वर्षीय युवकाचा प्रेरणादायी प्रवास; नर्सरीतून ४० लाखांची वार्षिक उलाढाल

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : आज नोकरीच्या मागे धावणारे हजारो युवक आपल्याला दिसतील.त्यातील काहीजण त्यात यशस्वी झाल्याचे पहायला मिळत आहे,तर काहींचे अर्धे अयुष्य पेपर सोडवण्यातच गेले.मात्र सूरज राऊत या तरुणाचे अवघ्या 16 व्या वर्षी वडिल सुभाष राऊत यांचे छत्र हरवले.वडील कृषी खात्यात होते.सूरज मोठा झाल्यानंतर वडीलांचे ऑन ड्यूटी निधन झाल्याने अनुकंपावर नोकरी करण्याची आयती संधी चालून आली.मात्र सुरजने ती नाकारली आणि घरच्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की,मला नोकरीत रस नाही.मी व्यवसाय करणार आहे.जिथे मी स्वत: मालक असेल.तसे पाहिले तर नोकरी आणि व्यवसायात फरक हाच आहे की नोकरी करताना बंधने फार येतात ती व्यवसाय करताना येत नाहीत.नोकरीत जेवढी आयुष्यभर सेवा करून ऐवज जमा करू शकत नाहीत,त्याच्या कित्येक पट व्यवसायात ऐवज जमा करू शकतो.

मूळ बार्शीच्या असलेल्या अवघे वय-28 वर्षे असलेल्या सूरज राऊत या तरुणाने बार्शीपासून 5 किमी असलेल्या संत बाळूमामा मंदिरासमोरील त्यांच्या 4 एकर पडीक असलेल्या शेतात मागील वर्षी किसान जंक्शन हायटेक नर्सरी या नावाने नर्सरी उभारली.यावेळी सुरजला सुदैवाने शेती व्यवसायात तज्ञ असलेली शामनंदन फरताडे,अलंकार फरताडे,अक्षय मिसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या व्यक्तिमुळेच 10 एकर पडिक असलेल्या जमिनीचा उपयोग नर्सरीसाठी करण्यात आला.ज्यातून पहिल्याच वर्षी सुरजने 40 लाखांचे उत्पन्न घेतले.आज किसान जंक्शन नर्सरीचे जिल्हाभर नाव झाले असून अनेक लोक तर खास नर्सरी पहाण्यासाठी इथे येतात.यापुढेही सूरज शेती व्यवसायात गांडूळ खत निर्मिती,फळबाग असे विविध प्रयोग राबवणार आहे.यावेळी सुरजने तरुणांनी करिअर करण्यासाठी उद्योगात कशाची लाज आणि भीती न बाळगता उद्योगात उतरण्याचे अवाहन केले.

किसान जंक्शन हायटेक नर्सरीचे वैशिष्ट्ये
४भाजीपाला, फळझाडे, शोभेचे झाडे, वृक्षरोपणाचे झाडे एकाच ठिकाणी असलेली एकमेव नर्सरी.तसेच येथे सर्व जातींची फळझाडे,भाजीपाला आणि शोभेचे झाडेही उपलब्ध. कमी काळात ग्राहकांची जास्त पसंती.

व्यापा-यासह शिक्षकाला ऑनलाईन गंडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या