22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसोलापूरविमा पॉलिसी पैशाच्या बहाण्याने फसवणूक करणार्‍यांना अटक

विमा पॉलिसी पैशाच्या बहाण्याने फसवणूक करणार्‍यांना अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचा बहाणा करून सोलापुरातील लोकांना दोन कोटींचा गंडा घालणान्या सात जणांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

भाऊसाहेब काशिनाथ धुमाळ (रा. सोलापूर) यांनी जानेवारी २०१५ ते जुलै २०२१ पर्यंत आरोपींच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण ५४ इन्शुरन्स पॉलिसी काढल्या. पॉलिसी स्वतःच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर काढल्या होत्या. भावाच्या शेतामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीचा टॉवर बसविण्याकरिता व पीएसयू बॉन्डचे भरलेले पैसे भाऊसाहेब धुमाळ यांना परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. वेळोवेळी पाच जणांनी एक कोटी ३६ लाख ७० हजार रुपये ऑनलाईनद्वारे घेऊन फसवणूक केली होती. विजापूर नाका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

विजयकुमार व्यंकटेश विटकर (रा. सोलापूर) यांना दि. २१ फेब्रुवारी ते १४ एप्रिल २०२२ दरम्यान फोनद्वारे संपर्क साधला. मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो. असे सांगून ८१ लाख ३९ हजारांची फसवणूक केली होती. या प्रकरणी जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी फैजान तुफेल अहमद (रा. त्रिलोकपुरी, दिल्ली), अमित राजकुमार (रा. विनोबापुरी तिसरा मजला, लजपत नगर २. दिल्ली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, विजय पाटील, दत्तात्रय काळे, फौजदार मोहन पवार आदी कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

फसवणूकप्रकरणी तपास करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्ली येथील स्थानिक पोलिसांनी मदत केली. दोन्ही गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सात जणांना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना न्यायाधीशांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पार्थ ऊर्फ साहिल किशन शर्मा
(वय २९), रोहित मोहन किशन अरोरा (दिल्ली), सूरज शामल दास (वय २२, रा. (वय २८, दोघे रा. बलवीर नगर, शाहदरा जोशी कॉलनी मंडावली, पूर्व दिल्ली), दिल्ली), समशेर अन्वर अल्वी (वय २७, जय पवित्र दास (वय २४, रा. जोशी रा. न्यू सिमापुरी, दिल्ली सध्या रा. बी कॉलनी, मंडावली पूर्व, दिल्ली) अशी ६२, गल्ली नं. ४ चाँदबाग, भजनपुरा, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या