24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeसोलापूरआयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणा-या टोळीचा पर्दाफाश

आयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणा-या टोळीचा पर्दाफाश

एकमत ऑनलाईन

सोलापूर : आयपीएल क्रिकेट मॅच मधील षटकार,चौकारावर हजारो रुपयांचा सट्टा घेणा-या टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून या सट्याचे नियंत्रण केले जात होते. आयपीएल सट्टा खेळण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य तसेच इतर वस्तूंसह पोलिसांनी ३८ लाख ४४ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चेतन रामचंद्र वन्नाल (वय-२६, रा. गांधिनगर झोपडपट्टी अक्कलकोट रोड सोलापूर), (विग्नेश नागनाथ गाजून वय-२४, रा.भद्रावती पेठ सोलापूर), अतुल सुरेश शिरशेट्टी शेट्टी (रा.अवंतीनगर सोलापूर) व प्रदीप मल्लय्या कारंजे , (भवानी पेठ सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅच वर सोलापुरातून सट्टा लावला जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला समजली होती. तिच्या आधारे पोलिसांनी आरोपी चेतन यास ताब्यात घेतले होते.त्याने दिलेल्या माहितीवरून शहर गुन्हे शाखेचे पथक कर्नाटकातील गुलबर्गा येथे रवाना झाले.त्यांनी तेथे एका घरात बसून सट्टा चालवीत असलेले आरोपी अतुल व प्रदीप यांना ताब्यात घेतले.त्यानंतर सट्टा लावण्यासाठी वापरण्यात येणारे तीन लॅपटॉप १ ते १३ मोबाईल,एक माईक तीन लॅपटॉप,हॉट लाईन मशीन तेरा जोडलेली मोबाईल मॉडेल सेट टॉप बॉक्स,टीव्ही असा तीन लाख ३३ हजार रुपयांचा व एक कार असा साधारण ३८ लाख ४४ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सोलापुरातील अवंती नगर येथील पर हाईट्स या इमारतीतील घरांमधून सट्टा घेण्याचे काम सुरू होते पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता,चालू क्रिकेट मॅच पहात क्रिकेटचा टॉस कोण जिंकेल तसेच सहा दहा पंधरा व वीस वर्षाच्या स्टेशन मध्ये किती धावा निघतील व शेवटी कोणती टीम जिंकेल यावर मोबाईल द्वारे सट्टा लावणारे तरुण मिळून आले.या सट्टा मध्ये लाखो रुपयांचा फायदा घेणारे भागीदार असल्याचे तपासात उघड झाले आहे.हे भागीदार बक्षिसाच्या रकमेचे आमिष दाखवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करीत असताना पोलिसांना मिळाले.तसेच कोरोनाच्या संसर्गाच्या साथीची कोणतीही खबरदारी न घेता स्वत:ची सुरक्षितता तसेच इतरांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचे कृत्य ही या आरोपींनी केले आहे.

आरोपींविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात जुगार कायद्याप्रमाणे व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.हि कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,पोलीस उपायुक्त बापू बांगर ,सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार औदुंबर पाटोळे,दिलीप नागटिळक, पोलीस नाईक जयंिसग भाई,पोलीस कर्मचारी संजय साळुंखे,सिताराम देशमुख,गणेश शिंदे,सागर गुंड, विद्यासागर मोहिते,सोमनाथ सुरवसे,अश्रूभान दुधाळ, कुमार शेळके,सनी राठोड,सुरज देशमुख,महिला पोलिस कर्मचारी आरती यादव पोलीस नाईक राहुल गायकवाड व नेताजी गुंड यांनी केली.

शेताला जाण्यासाठी रस्ता नसल्याने सोयाबीनच्या गंजीला शेतकऱ्यानेच लावली आग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या