27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeसोलापूरकुर्डूवाडी रेल्वे स्थानकास आयएसओ मानांकन

कुर्डूवाडी रेल्वे स्थानकास आयएसओ मानांकन

एकमत ऑनलाईन

कुर्डूवाडी :  येथील रेल्वे स्थानकास उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल आयएसओ 14001 हे मानांकन मिळाले आहे. त्यामूळे कुुर्डूवाडी हे मध्य रेल्वेचे प्रमुख केंद्र बनले आहे. दरम्यान शुक्रवारी कुर्डूवाडीसह अहमदनगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबुर्गि, साईनगर शिर्डी, वाडी या सोलापुर विभागातील नऊ रेल्वे स्थानकास आयएसओ मानांकन मिळाले आहे.

सोलापुर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक प्रदिप हिरडे यांच्याकडे आयएसओ 14001 मानांकन सुपूर्द करण्यात आले.  एनएबीसीबी मान्यता प्राप्त बोर्डाव्दारे लेखापरिक्षण करण्यात आले. ऑडिट केलेल्या काही पैलूंमध्ये या स्थानकाच्या छतावर पडणा-या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, फ्लैटफॉर्म वरील कव्हर शेडवर सौरऊर्जेचे पॅनल बसवणे, प्लास्टिकमुक्त स्थानक बनवणे, यांत्रिकीकृत साफसफाईचा वापर, कच-याचे निर्मितीकरण, वॉटर ऑडिट, ऊर्जा ऑडिट, ध्वनिप्रदूषण, प्रवाशांना देण्यात आलेल्या सेवासुविधा, बॅनर, पोस्टर्स, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांव्दारे प्रवाशांची होणारी जनजागृती तसेच अन्य कार्याचा समावेश आहे. कुर्डूवाडी स्थानकाचे दोन वेळेस आयएसओ कंपनीच्या कर्मचा-यांनी निरिक्षण केले. प्रमाणपत्र तीन वर्षासाठी वैद्य असणार आहे.

हिंगोलीत लालपरीचे चाके मात्र गाळातच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या