सोलापूर :- सोलापूर शहर युवक काँग्रेसने वाढत्या बेरोजगारीविरोधात, युवकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी आज रोजी महराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट सोलापूर समोर निदर्शने करुण जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी रोजगार दो, भाजप सरकार रोजगार दो, रोजगार दो या जेल भेज दो, अश्या जोरजोरात घोषणा देण्यात आल्या यामुळे जिल्हाधिकारी परिसर दणाणुन गेला, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या दोनशे पदाधिकारी, युवकांना अटक केली.
यावेळी बोलताना प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की युवकांना वर्षाला 2 कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले होते. पण रोजगार द्यायचे सोडून यांच्या चुकीच्या धोरणामुळे असलेल्या नोकऱ्या जात आहेत. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यात झाली. त्यात वस्तू सेवा कराच्या (GST) चुकीच्या अंमलबजावणीमूळे कुटीर- लघु-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली.
तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला होता. यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार झाले तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे.पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून नुकतेच भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून -२३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे समोर आले आहे.
जीएसटीचा योग्य तो वाटा न मिळाल्याने राज्यांची आर्थिक स्थिती बेतास बात आहे. खरेतर केंद्र सरकारने कोरोनाच्या कठीण समयी राज्यांना आर्थिक मदत करून सक्षम केले पाहिजे, उद्योजधंद्याना रोख आर्थिक पॅकेज दिले पाहिजे, जेणेकरून रोजगार निर्मिती होईल. केंद्र सरकार बिगरभाजप शासित राज्यांची आर्थिक कोंडी करण्यात धन्यता मानत आहे. अशा परिस्थितीत बिगरभाजप शासित राज्यांना कारभार चालवणे मुश्किल होऊन बसले आहे. सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत असे करुण पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना देशोधड़ीला लावत आहेत.
पंतप्रधान मोदींनी हे सर्व करण्यापेक्षा दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जागून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे.युवक हे निराश झाले आहेत, आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीची स्वत:ची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तरुण हातांना काम हवे आहे. म्हणून आज आम्ही बेरोजगार युवकांचा आवाज मोदी सर्कारपर्यंत पोहोचविण्यासाठी, रोजगाराच्या मागणीसाठी रोजगार दया अथवा जेल मध्ये घाला म्हणत निदर्शने करुण जेल भरो आंदोलन केले आहे.
या जेलभरो आंदोलनात दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, कार्याध्यक्ष पंडित सातपुते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, राजासाब शेख, राहुल वर्धा, राहुल गोयल, महेश लोंढे, अमोल भोसले, संतोष अट्टेलुर, यल्लाप्पा तुपदोळकर, सुभाष वाघमारे, हितेश कुकरेजा, जावेद कुरेशी, किरण राठोड, तनवीर इनामदार, सिद्धान्त रंगापुरे, घायल करगुळे, धर्मराज गुंडे, संजय गायकवाड़, राजेन्द्र शिरकुल, चंद्रकांत पागे, अभिषेक गायकवाड़, मोनेश घंटे, मौलाली इंगळगी, भीमा बज्जर, मनोहर माचर्ला, नरेश एलुर, शिवराज कोरे, इरफान शेख, श्रीकांत गायकवाड़, अजय अवलुर, गजानन मोरे, राजू वाघमारे, बसु कोळी, शशि उपाध्ये, यांच्यासह इतर पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने या जेल भरो आंदोलनात सहभागी झाले होते.
सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाची चाचणी थांबविली