23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरजेलमधील आरोपीला मोबाईल पुरवणा-यास अटक

जेलमधील आरोपीला मोबाईल पुरवणा-यास अटक

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : जेलमधील आरोपींना खिडकीतून मोबाइल पोहोच करणा-याला पोलिसांनी अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सबजेलच्या इमारतीच्या मागील बाजूच्या चार नंबर रूमच्या खिडकीजवळ अनोळखी व्यक्ती भिंतीवर चढून खिडकीतून आतमध्ये हात घालताना ७ जून रोजी दुपारी ३ वाजता जेलर महेश जाधव यांच्या दृृष्टीस पडला. तो व्यक्ती जेलमधील कैद्यांना काही तरी वस्तू पुरवित असल्याचा संशय जाधव यांना आला. जाधव तेथे पोहोचेपर्यंत त्याने पलायन केले होते. मात्र, नंतरपुन्हा तो व्यक्ती जेलच्या पुढील बाजूस दिसून आला. त्यावेळी हेड कॉन्स्टेबल मंडलिक यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने नाव सचिन दत्तात्रय अभंगराव (रा. पंढरपूर) असे सांगितले.

त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत त्याने सबजेलमध्ये असलेले आरोपी विशाल माणिक नेहतराव व श्रीकांत कोताळकर यांना भेटण्यासाठी व त्यांना जामिनाबाबतचा निरोप देण्यासाठी गेल्याची कबुली दिली.

बालकांचे संरक्षण कायद्यानुसार दाखल लैंगिक अत्याचार गुन्ह्यात विशाल नेहतराव व श्रीकांत कोताळकर हे दोघे सध्या पंढरपूर सबजेलमध्ये आहेत. त्यांना मोबाईल पुरविण्यासाठी सचिन अभंगराव तेथे गेल्याचे समोर आले आहे. आता विशाल व श्रीकांत यांना जेलमध्ये मोबाईलची गरज का भासली, याची चौकशी सुरू असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सी.व्ही. केंद्रे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या