21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरस्मशानभुमीसाठी जल समाधी आंदोलन

स्मशानभुमीसाठी जल समाधी आंदोलन

एकमत ऑनलाईन

अकलूज : अडीच वर्षापुर्वी अज्ञातांनी पानिव ता माळशिरस गावातील स्मशानभुमी पाङुन टाकली. तेव्हापासून पानिवकरांना दहनासाठी दुस-या गावच्या स्मशानभुमीमध्ये जावे लागत आहे. अडीच वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनास जाग येत नसल्याने अखेर पानिव ग्रामस्थांनी आमरण उपोषण आणी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलाय.

पानिव गावातील बाबासाहेब शेंडगे व जगन्नाथ तोरणे हे गत अडीच वर्षांपासून पानिव गावाला स्मशानभुमी व्हावी याकरीता प्रशासन दरबारी हेलपाटे करत आहेत. काही अज्ञात समाज कंटकांनी पडलेली स्मशानभुमी पुर्ववत करावी म्हणुन न्याय मागत आहेत. परंतू त्यांची कोणी दखल घेत नाहीत. स्मशानभूमीसाठी जिल्हाधिक-यांनी सुमारे ४२ गुंठे जागा अधिग्रहीत केलेली आहे. परंतू ग्रामपंचायत येथे स्मशानभुमी बांधत नाही.

कोरोना काळात पानिव गावात मयत झालेल्या व्यक्तींना दहनासाठी अकलूजच्या स्मशानभुमीत न्यावे लागत होते. आजही गावात स्मशानभुमी नसल्यामुळे आजुबाजुच्या गावात दहनासाठी जावे लागतेय. यामुळे सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत. गत अडीच वर्षांपासून प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाहीकिंवा या मागणीला महत्व दिले नाही. त्यामुळे बाबासाहेब शेंडगे व जगन्नाथ तोरणे यांनी एक महीन्यापुर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी आमरण उपोषण सुरु केले व बुधवार दि. २८ रोजी पाणीवच्या ओढ्यात उतरुन जलसमाधी आंदोलन सुरु केले. न्याय न मिळाल्यास येथेच जलसमाधी घेण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

नगरपालिकेवर राष्ट्रीय समाज पक्षाचा तिरडी मोर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या