21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसोलापूरटेंभुर्णी बस स्टँडसमोर जनशक्ती संघटनेचे झाडे लावून आंदोलन

टेंभुर्णी बस स्टँडसमोर जनशक्ती संघटनेचे झाडे लावून आंदोलन

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : टेंभुर्णी बस स्थानकासमोरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून जनशक्ती शेतकरी संघटनेने आंदोलन केले. टेंभुर्णी बस स्थानकासमोरील रस्ता हा रहदरीचा असूनही या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेने या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध केला.

टेभूर्णी हे हायवे वरील गाव आसून माढा तालुक्यातील हे प्रमुख शहर आहे ही शेतक-यांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. चाळीस ते पन्नास गावचा या ठिकाणी वावर असून येथून शेतकरी बि बियाने ,खते आणी कॉलेज, शाळा, हॉस्पीटल या साठी कायमस्वरूपी येत असतात येथे कायम स्वरूपी वर्दळ आसते.
पुणे, मुंबई ,लातुर ,सोलापूर, कर्नाटक, आन्ध्र आणी मराठवाडा या ठिकाणी या मार्गावरून बस आणी खाजगी वाहतुक होत आसते. हा मराठवाडा आणी पश्चिम महाराष्ट्रला जोडणारा शहरातील मुख्य प्रवेशद्वार म्हणून टेभूर्णीची ओळख आहे.

या ठिकाणी अनेक आपघात झाले आहेत. काही लोकांना या खड्ड्यांमुळे आपला जिव गमवावा लागला आहे. या प्रश्नाला वाचा फुटावी म्हणून आचानक आंदोलनाचा पवित्रा घेत रस्त्यावरच सरकारविरुद्ध घोषणा देत रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावण्याचे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाची एकच धावपळ झाली आणी महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी अतुल खुपसे – पाटील यांच्याशी फोनवरून सवांद साधत दोन दिवसात रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी अतुल खुपसे- पाटील जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल जगदाळे, प्रहार औद्योगिक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय गोरे जिल्हायुवा सेना सरचिटणीस विठ्ठल मस्के, किरण भांगे ,जनहित शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष रामभाऊ खटके , दत्ता कोल्हे ,योगेश नाळे गणेश खोटे ,अतुल माने विशाल सुरवसे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार-सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या