22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरपुण्यात जात असलेला कर्नाटक गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला

पुण्यात जात असलेला कर्नाटक गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला

एकमत ऑनलाईन

सांगोला : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सो मा उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील, मंगळवेढा विभाग तसेच पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर सांगोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना कोव्हीड १९चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता कारवाईसाठी सांगोला शहरात पोलीस गस्त चालू असताना ०५ एप्रिल २०२१ रोजी दुपारी.०३ .००वाजेच्या सुमारास पोना.महेश पवार व पो.काँ.सचिन देशमुख यांनीचिंचोली रोड,वंदे मातरम चौक सांगोला येथे एम.एच.१४ जीडी.५२४४ हा आयशर टेंपो संशयापद स्थितीत मिळून आला.त्यावरील चालक हसन सिराज शेख रा.कोंडवा बु!! पुणे तसेच अल्लाबश अब्दुलगनी बागवान रा.जळकोट ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी टँपोमध्ये विमल पान मसाला,तंबाखूजन्य जर्दा व बोंबील भुसा,कांदे असल्याची माहीती दिल्याने हदर टेंपो सांगोला पोलीस ठाणेयेथे आणण्यात आला.

सदर टेंपोची स.पो.काँ.कल्याण ढवणे यांनी दोन पंचासमक्ष तपासणी व पंचनामा केला असता त्यामध्ये विमल पानमसाला ५,८२,१२०-५,६१०००-१,२०,००० व्ही-१ सुगंधीत तंबाखु ६९३००-१,३२,००० अशी एकुण४१ पोती१४६४४२०/- रुपये चा ऐवज मिळून आलेने लागलीच याबाबत मंगेश मल्हारी लवटे वय.३४,धंदा नोकरी,सहा.अयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन,म.रा. सोलापूर प्रशासकिय इमारत २ मजला,जिल्हाधिकारी यांचे कार्यालय परिसर सोलापूर यांना कळविण्यात आले. त्याच प्रमाणे त्यांनी पथकासह दि.०६/०५/२०२१ रोजी सांगोला पोलीस ठाणे येथे येऊन मिळून आलेल्या मालाची तपासणी करुन सदरचा गुटखा,पान मसाला व सुगंधीत तंबाखु ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असतानाही त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा वाहतूक करुन अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चा भंग केला असल्याबाबत दोन्ही चालक व बालाजी कर्ली पुणे अशा आरोपीविरुध्द सविस्तर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

सदर टेंपोमध्ये गुटखा भरला असल्याचे कोणास कळू नये व गुटखा पकडला जाऊ नये याकरीता दोन्ही चालकानी टेंपोत वरील बाजूस घाणेरडा वास येत असलेले बोंबील,भुसा,कांदे टोमँटो, आले असे भरून तरकारी असलेला देखावा निर्माण केला असतानाही पोलीसांच्या नजरेतून गुटखा लपला गेला नाही व मोठी कारवाई करण्यात आली आहे.सदरच्या गुन्ह्याचा तपाह पो.नि.भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोकाँ.कल्याण ढवणे हे करीत आहेत. कोरोना कोव्हीड१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आदेशांचे सर्वांनी पालन करावे,कोणीही नियमाचा भंग करुन बेकायदेशीर क्रत्य,अवैध वाळू वाहतूक अवैध गुटखा दारु विक्री-साठा-वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यासकिंवा विनाकारण बाहेर फिरणे मास्क न लावणे असा प्रकार करताना आढळून आल्यास गुन्हा दाखल करून रिमांड घेवुन जेलमध्ये टाकण्यात येईल असे पोनि.भगवान निंबाळकर यांनी कळविले आहे.

अहो, चव्हाण साहेब… जरा आमच्याकडेही लक्ष द्या हो..

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या