Wednesday, September 27, 2023

संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवा

सोलापूर : बार्शी तालुक्यातील सर्व संशयित व्यक्तींना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. बार्शी तालुक्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शंभरकर यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली. उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार डी.एस.कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, तालुका समन्वयक तथा सहायक निबंधक अभय कटके, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.शितल बोपलकर,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, आदी उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांची त्याच दिवशी तपासणी करावी. अतिजोखमींच्या संपर्कातील आणि कमी जोखमींच्या संपर्कातील किमान वीस व्यक्तींचे ट्रेंिसग करा. नागरिकांचे सर्व्हेक्षण करा. त्यातून आयएलआय (इन्फ्लूएंजा लाईक इलनेस) आणि सारीची (सिव्हीअर अ‍ॅक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) लक्षणे असणा-या सर्व नागरिकांची तपासणी करा. त्यामध्ये संशयित आढळणा-या व्यक्तींना होम क्वॉरंटाईन न करता इन्टिट्यूशनल क्वारंटाईनवर भर द्यावा.

शंभरकर यांनी जामगांव येथे भेट देवून जामगावचे सरपंच शुभांगी आवटे, उपसरपंच बालाजी गडदे, ग्रामसेवक रणजित माळवे आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. तसेच कंटेन्मेंट झोनला भेट दिली.

Read More  मानवत-मानोली रस्त्याची झाली दयनीय अवस्था

खासगी दवाखान्यांच्या बिलांचे लेखा परीक्षण काळजीपूर्व करा
खाजगी दवाखान्यांच्या बिलांबाबत सामान्य जनतेच्या तक्रारी येता कामा नयेत. खाजगी दवाखान्यातील बिले शासकीय नियमानुसार आहेत की नाहीत, याचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी दवाखान्यातील बिलाबाबत व्हीडिओ कॉन्फरंिन्सगद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या