21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरवडिलांना ठार मारले; मुलाला सक्तमजुरी

वडिलांना ठार मारले; मुलाला सक्तमजुरी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : वडिलांच्या डोक्यात विटा व फरशीने मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी, मुलास जिल्हा व सत्र न्यायाधीश आवटी यांनी तीन वर्षांची सक्त मजुरी व ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.विजय नागनाथ सत्याराम (रा.

हनुमान मंदिरच्या समोर, हुडको मोदी, सोलापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विजय सत्याराम हा नेहमी दारू पिऊन गल्लीतील लोकांसोबत व आई-वडिलांसोबत भांडण करीत असे. घटनेच्या दोन महिन्या अगोदर विजय सत्याराम याने आई आंबूबाई यांना मारहाण करून दुखापत केली होती.

२१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास वडील नागनाथ हणमंतू सत्याराम (वय ५५) यांना विटा व फरशीने डोक्यात मारहाण करून जखमी केले होते. २६ डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक एम. एस. बेंबडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता नागनाथ बी. गुंडे यांनी आरोपीची आई आंबूबाई ही वयस्कर असून, मुलगा जरी आरोपी असला तरी सत्य घटना न्यायालयासमोर सांगितली आहे. त्यास गुन्ह्यातील साक्षीदार विकी संगटे यांनी दुजोरा दिला आहे. केलेला युक्तिवाद व वैद्यकीय पुराव्याच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. आवटी यांनी सक्तमजुरी ठोठावली. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस नाईक नदाफ, पोलिस शिपाई कोठाणे यांनी काम पाहिले. तपास पोलिस उपनिरीक्षक एम.एस.बेंबडे यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या