21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeसोलापूरराज्य महामार्ग क्रमांक 61वर खड्डयाचे साम्राज्य

राज्य महामार्ग क्रमांक 61वर खड्डयाचे साम्राज्य

एकमत ऑनलाईन

सांगोला (विकास गंगणे) : जत ते मंगळवेढा हा रस्ता राज्य महामार्ग म्हणून ओळखला जातो. यावरून सोलापूर तसेच विजापूर या शहरांना जवळचा मार्ग म्हणून हा महामार्ग ओळखला जातो .परंतु सध्या या महामार्गावर खड्डयात रस्ता कि रस्तावर खड्डा असा प्रकार सर्वत्र आहे. परंतु याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग जाणुनभुजुन दूर्लक्ष करत आहे.तसेच रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत परंतु याकडे हा विभाग दुर्लक्ष करून काय साध्य करत आहे.या रस्त्यावर आता अनेक दुध प्रक्रिया केंद्र तसेच तरकारी वाहतूक केली जाते.परंतु या महामार्गाची अशी अवस्था तर दुसऱ्या गावपातळीवरील रस्त्याची अवस्था विचारायला नको.

या मार्गावरील लोक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत पण लोकांच्या जिवाचे या अधिकाऱ्यांना काय पडले आहे. आपणास गलेलठ्ठ पगार मिळतोय तसेच रस्ता दुरुस्ती करणे यासाठी चिरीमिरी मिळतेय मग हा रस्ता आहे तसाच राहिले तर बरे वाटते का असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे. हा महामार्ग नक्की महामार्ग आहे का हे यांच्या अवस्थेवरुन कळते .परंतु याविषयी घोडे कोठे अडले आहे हा मोठा प्रश्न आहे.या मार्गावर दुरुस्ती नसल्याने अनेक मोठे अपघात झाले आहेत परंतु याकडे लक्ष देण्यासाठी गलेलठ्ठ पगार असलेल्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. हा रस्ता लोकासांठी मौत का कुआ झाला आहे.तसेच रोज एक अपघात घडुन येत आहे. यास जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या