21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरभाजीविक्रेत्यावर चाकूहल्ला

भाजीविक्रेत्यावर चाकूहल्ला

एकमत ऑनलाईन

बार्शी : लिलावासाठी पहाटे भेंडी घेऊन निघालेल्या भाजीविक्रेत्याला अडवून उपरण्याने गळा आवळत चाकूहल्ला करून जखमी केले. एवढ्यावर न थांबता रोकडसह मोबाईल पळविल्याची घटना घडली.

बुधवार, ६ जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान बार्शी शहरात संतोषीमाता चौकात ही घटना घडली. या प्रकारानंतर जखमी भाजीविक्रेते सुहास रमेश शेळके (वय ३२, रा. बेलगाव, ता. बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुहास हे एका दूध डेअरीत काम करतात. शिवाय ते भाजी विक्री करून प्रपंच चालवतात. ते घरातून बार्शी येथे भेंडी आणि इतर भाज्या आणून लिलावाद्वारे त्याची विक्री करतात. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास लिलावासाठी भेंडी काढून दुचाकीवरून विक्रीसाठी निघाले. बार्शी शहरात संतोषीमाता चौकात येताच तीन चोरटे समोर आले आणि त्यांची दुचाकी अडवली. त्यांनी उपरण्याने शेळके यांचा गळा आवळत चाकूने वारही केले. तसेच खिशातील रोकड व मोबाईल घेऊन तेथून पोबारा केला. तसेच त्याच्या गळ्यातील उपरण्याने गळा आवळून ओरडलास तर जीवे मारीन असे धमकावले. या हल्ल्यात पाठीवर जखम झाली. चोरट्यांच्या हल्यात घाबरून शेळके पळून जात असताना चोरट्यांनी लाकूड फेकून मारल्याने डोक्यास मार लागून जखम झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या