33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home सोलापूर पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड लस निर्माण करण्यात आली असून, लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी सचिन ढोले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहिसलदार विवेक सांळुखे,, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरंिवद गिराम, डॉ.प्रदिप केचे, प्रसन्न भातलवंडे, डॉ.दीपक धोत्रे, डॉ.अनंत पुरी , डॉ.संभाजी भोसले, डॉ.शिवकमल याच्यासह लसीकरण केंद्रावर नियुक्त केलेले अरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील लसीकरण वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरंिवद गिराम यांना परिचारीका मंगल कर्चे, यांनी पहिली कोविड लस दिली. पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणा-या संबंधित कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन अ‍ॅपवर यादी संकलित करण्यात आली आहे. लसीकरणासाठी 2 हजार 928 जणांनी कोविन अ‍ॅपवर नांव नोंदणी आहे. आरोग्य सेवेशी संबंधित 100 जणांना आज लस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर लस सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 यावेळेत देण्यात आहे. या कामासाठी 5 आरोग्यसेविकांचे पथक नेमण्यात आले आहे. लसीकरणाबाबत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लसीकण केंद्रावर लसीकरण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, निरिक्षण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवून यावे. लाभार्थी लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची माहिती घेवून तसेच तापमान, ऑक्सीजन तपासणी करुनच लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण कक्षातून लस दिल्यानंतर संबधिताला अर्धा तास निरिक्षण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. कोविन अ‍ॅपवरील नोंदणी व्यतिरिक्त इतर कोणात्याही व्यक्तीला लस दिली जाणार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर दुर्धर आजार तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांना या लसीकरणातून वगळ्यात असल्याचे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले.

बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या