25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeसोलापूरकोरोना नियंत्रणासाठी सांगोला नगरपरिषदेकडून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेच्या 'दुसऱ्या' फेरीस प्रारंभ

कोरोना नियंत्रणासाठी सांगोला नगरपरिषदेकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या ‘दुसऱ्या’ फेरीस प्रारंभ

एकमत ऑनलाईन

सांगोला (विकास गंगणे) : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी करणे, आजाराचे लवकर निदान करून कोरोनाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य शासनाने 15 सप्टेंबर पासून सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सांगोला नगरपरिषदेने गृहभेटीची पहिली फेरी पूर्ण केली असून 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात करण्यात आली आहे.

दुसऱ्या फेरीचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या उपस्थितीत झाला.याप्रसंगी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सर्व्हेक्षण पथकातील सर्व सदस्यांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले……या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केला गेला. या कालावधीत शहरातील 7651 कुटुंबांचा घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली गेली व कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले.

तसेच कोरोनामुळे बदलत्या जीवनशैलीत नागरिकांनी घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले गेले. दुसऱ्या फेरीमध्ये आरोग्य पथके शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांचे पुन्हा एकदा कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांची तपासणी करनार आहेत . यामध्ये नागरिकांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल मोजण्यात येऊन दरम्यानच्या काळात घरातील कोणाला मोठा आजार होऊन गेला का याची खात्री करण्यात येईल. तसेच पहिल्या फेरीच्या वेळी गैरहजर असणाऱ्या घरातील व्यक्तींची कोमॉर्बिड स्थिती जाऊन घेऊन ज्या नागरिकांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येतील अशा नागरिकांना कोरोना चाचणीकरीता ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाऊन त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेमार्फत योग्य ते उपचार केले जातील.

एकूण 10 पथकामार्फत ही आरोग्य तपासणी होणार असून प्रत्येक पथकामध्ये एक अंगणवाडी सेविका व एक नगरपालिका कर्मचारी अशे एकूण 20 जण असणार आहेत. या संपूर्ण मोहिमेचे नियोजन, संनियंत्रण कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, शिवाजी सांगळे व योगेश गंगाधरे यांच्या मार्फत केले जाणार आहे.

मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला नगरपरिषदेने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या पहिल्या फेरीत उत्तम नियोजन करून लोकप्रतिनिधिंच्या सहकार्याने संपूर्ण शहरात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व जनजागृती काम प्रभावीपणे केले. परिणामी शहरातील कोरोनास्तिथीमध्ये सुधारणा झाली असून आता या दुसऱ्या फेरीत देखील सर्वांनी आपल्या घरी आलेल्या पथकांना सहकार्य करून शहरातून कोरोना पूर्णतः नष्ट करण्याच्या प्रयत्नात आपले महत्वाचे योगदान द्यावे व सॅनिटायझर,मास्क व सुरक्षित अंतर या त्रिसूत्री चा वापर करून प्रत्येकाने खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा रक्षक व्हावे
कैलास केंद्रे, मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद

“माझे कुटुंब,माझी जबाबदारी” मोहिमेच्या पहिल्या फेरीतील आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे या मोहिमेचा असणारा मूळ उद्देश साध्य होत असल्याचे दिसून येत आहे.संशयित कोविड रुग्णांची माहिती घेऊन त्यांची तपासणी व उपचार केल्याने मागील 15 दिवसात सापडणाऱ्या रुग्णांची संख्या ही निम्म्याने कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी सर्व सांगोला शहरवासीयांना आवाहन करण्यात येते की या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीस देखील आपण सहकार्य करून कोरोनाला नष्ट करण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे.
सौ.राणिताई माने,नगराध्यक्षा सांगोला नगरपरिषद

केंद्र सरकारचे जीएसटीबाबत एक पाऊल मागे; १.१० लाख कोटींचे कर्ज काढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या