19.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home सोलापूर बार्शी नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळा भाडेबाबत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांचा आक्षेप

बार्शी नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळा भाडेबाबत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांचा आक्षेप

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी शॉपिंग सेंटरच्या नपरवडणाऱ्या गाळा देण्यावर आक्षेप घेतला असून त्याची तक्रार अक्कलकोटे यांनी पालकमंत्री भरणे,जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी सोलापूर व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याकडे केली आहे.पुढे त्यांनी बार्शी नगरपरिषदेच्या नगर भूषण कै शंकरराव उर्फ भाऊसाहेब झाडबुके व्यापारी संकुल,नगर शेठ कै बाळासाहेब नागनाथ (आप्पा) कथले व्यापारी संकुल वीर शिरोमणी महाराणा प्रताप व्यापारी संकुल,भाई मच्छिंद्र तात्या यशवंत पवार व्यापारी संकुल,भगवंत मैदानामधील स्टेडियम गॅलरी खालील दुकान गाळे,कै बाबुराव भगवंतराव कुदळे व्यापारी संकुल,गाडेगाव रोड येथील दुकान केंद्र या विविध शॉपिंग सेंटर मधील गाळा भाड्याने देणे संदर्भाने मा.उपविभागीय अधिकारी सोलापूर -१ यांच्या अध्यक्षतेखाली मा.त्रिसदस्यीय समितीने ठरविलेल्या दराप्रमाणे अपेक्षित वार्षिक उत्पन्न गृहीत धरून अपेक्षित नगरपरिषदेसाठी अधिमुल्य रकमे पासून मिळणारा वार्षिक परतावा रक्कम,अपेक्षित वार्षिक भाडे निश्चित करण्यात आलेले आहे.

या संपूर्ण त्रिसदस्यीय समितीच्या आदेशाच्या कार्यपद्धतीची अवलोकन केले असता सदरचे अधिमूल्य(अनामत रक्कम ) व गाळा भाडे आणि त्यावर १८% जीएसटी सिएसटी व ४६ टक्के करवसुली (घरपट्टी)यानुषंगाने संपूर्ण ६४ टक्के अतिरिक्त कर अशी एकूण रक्कम लक्षात घेता होणारी रक्कम अव्यवहार्य अवाजवी असल्यामुळे आणि सदरची रक्कम परवडणारी नसल्यामुळे या शॉपिंग सेंटर मध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी हा मोठा अन्याय ठरणार आहे.बार्शी शहरातील अण्णासाहेब बारबोले शॉपिंग सेंटरमधील ४० पैकी ७ गाळे रिक्त आहेत ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग जवळील हॉस्पिटलच्या २४ पैकी ४ रिक्त आहेत,छत्रपती संभाजीराजे शॉपिंग सेंटर मधील ३१ गाळ्यापैकी ११ रिक्त आहेत,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर मधील ९८ गाळ्यापैकी २१ गाळे रिक्त आहेत,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर मधील २० गाळ्यापैकी ८ गाळे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे.अनेकजणांनी घेतलेले गाळे त्याची अनामत रक्कम,भाडे त्यावरील जीएसटी सीएसटी,घरपट्टी व्यावसायिक दराने परवडत नसल्यामुळे गाळे परत करून अनामत रक्कम परत घेतलेली आहे.

तरी एकूण परिस्थितीचे अवलोकन करता बार्शी शहरात आता सद्यस्थितीत असलेल्या शॉपिंग सेंटर मधील रिक्त गाळ्याचेच प्रमाण पाहता नगरपरिषदेकडून त्रिसदस्यीय समितीने ठरविलेल्या दराप्रमाणे अधिमूल्य वार्षिक भाडे त्यावर घरपट्टी व त्यावर सीएसटी जीएसटी कर याच्या एकूण रकमा अत्यंत अन्यायकारक होत असल्याने त्रिसदस्यीय समिती कडे यापूर्वी झालेल्या शॉपिंग सेंटर लिलावाची पार्श्वभूमी लक्षात घेता या सर्व शॉपिंग सेंटर मधील अधिमूल्य भाडे निश्चिती साठी पुनः बैठक घेऊन वस्तुस्थिती जनक वास्तवदर्शी नगरपरिषदेकडून अहवाल मागून घेऊन त्याच्यावर कार्यवाई होणे अभिप्रेत आहे. सद्यस्थितीत त्रिसदस्यीय समितीने मंजूर केलेले भाडे न परवडणारे असून छोट्या सुशिक्षित बेरोजगारांना सदरचे भाडे अधिमूल्य रक्कम अर्थात अनामत रक्कम त्यावर घरपट्टी त्यावर सीएसटी जीएसटी हे संपूर्ण कर जाचक दिसून येत आहेत या पार्श्वभूमीवर तात्काळ उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक, सोलापूर यांना आदेशित करून सदर गाळ्याचे भाडे अधिमूल्य निश्चितीबाबत पुन्हा बैठक घेऊन वास्तवदर्शी अधिमूल्य व भाडे निश्चिती करण्याबाबत विनंती आहे.

मोठ्या कसरतीने जोपासलेल्या रेशीम शेतीला ग्रहण

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

जिल्ह्यात १३८ कोरोना मुक्त, तिघांचा मृत्यू, ९३ नवे बाधित

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 270 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 177 अहवाल...

फेसबुकवर पोस्ट लिहून बार्शीत तरुणाची आत्महत्या

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात सध्या आत्महत्या हाचिंतेचा विषय बनला आहे.मागील काही दिवसांपासून तालुक्यात आत्महत्येचे सत्रच सुरु आहे.त्यातच रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी बार्शी...

वरवडे टोल नाक्याजवळ २१४ किलोचा गांजा पकडला

टेंभुर्णी : वरवडे टोल नाक्याजवळ टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्यांचे टीम व मोडंिनब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैद्यरित्या विक्रीसाठी गांजा...

आ. भारतनाना भालके अनंतात विलीन

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यावर शनिवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रुनयनांनी भावनाविवश...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

‘त्या’ ठरावामध्ये सीईओ स्वामी यांनी घातले लक्ष

सोलापूर : कुमठे येथील जिल्हापरिषदेची शाळा आणि क्रीडांगण भाडे तत्वावर देण्याच्या ठरावावर सीईओ दिलीप स्वामी यांनी लक्ष घातल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. सर्वसाधारण सभेत...

थकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

सोलापूर : महापालिकेची थकबाकी भरण्यासंदर्भात महापालिका आयुक्­त पी. शिवशंकर यांनी सुनावणी घेतली. त्यांच्यासाठी अभय योजनाही लागू करण्यात आली. मात्र, तरीही थकबाकी भरणा न केलेल्यांची...

उद्यापासून तीन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुखदर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून शनिवारपासून दिवसभरात...

आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते वेंटीलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी...

महाराष्ट्राचा हक्काचा पैसा केंद्र सरकार देत नाही

बार्शी : महाराष्ट्र शासन केंद्र सरकारला ३५% टक्के जीएसटी देते,तरीही केंद्र सरकारने ७ महिन्यांपासून महाराष्ट्राला मिळणारा २८ हजार कोटींचा निधी दिला नाही.महिला व बाल...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...