23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeसोलापूरकोंडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे

कोंडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे

एकमत ऑनलाईन

उत्तर सोलापूर : चिंचोळी एमआयडीसी परिसरात आज सकाळी ८:००वाजण्याच्या सुमारास. बिबट्या सदृश प्राणी दिसला. कामगार वर्ग कामासाठी रिक्षामधून जात असताना एमआयडीसीमधील एलएचपी कंपनी जवळ झाडीमधून रस्ता क्रॉस करत असताना एक बिबट्या सदृश दिसून आला. बिबट्या सदृश प्राणी दिसल्यामुळे कोंडी,चिंचोळी आणि आजूबाजूच्या गावक-यांनी सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

बिबट्या हा नेहमी रात्री वावरणारा प्राणी आहे. अत्यंत लाजणारा प्राणी, मिळेल त्या जागेत राहणारा व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी. वृक्षतोडीमुळे या बिबट्याने शेती हेच आपले राहण्याचे स्थान निवडले आहे. घरालगत असलेली शेती व गुरांचे गोठे हे त्याला आकर्षित करतात. शेतीत सहज मिळणारे बेडूक, शेतक-यांच्या शेळ्या व मेंढ्या, कुत्रे ही त्याची मुख्य शिकार. तसेच शेतीला पाणी द्यावे लागते, त्यामुळे पाण्याचाही प्रश्न सुटतो. वाढत्या ईमारतींच्या जंगलामुळे व जंगलं नष्ट झाल्यामुळे त्याच्याकडे इतर पर्यायच उरला नाही.

 

सात ऑक्सिजन प्लांट्स उभरणीला गती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या