17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeसोलापूरमोहोळ शहर परिसरासह तालुक्यात बिबट्याची दहशत

मोहोळ शहर परिसरासह तालुक्यात बिबट्याची दहशत

एकमत ऑनलाईन

मलिकेपठ  : मोहोळ शहरासह आजूबाजूच्या गावात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.वनविभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जनतेतून मागणी होत आहे.

मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील शेतकर्यांना सर्व प्रथम बिबट्या काही दिवसांपूर्वी दिसला होता.त्याच्यानंतर बिबट्या मोहोळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या गुरव वस्ती,मोहोळ स्टेशन परिसरातील शेतकर्यांना दिसला आहे.त्यामुळे मोहोळ शहराच्या जवळपास असणार्या वस्त्यावरील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

मोहोळ स्टेशन परिसरात शेतकर्यांनी बिबट्या पाहिल्यानंतर मोहोळ स्टेशनपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खरकणे गावच्या हद्दीतील शेतकर्याचा पाळीव घोङा मारून आजूबाजूच्या शेतातील परिसरात बिबट्या फिरला आहे.त्याचे शेतात पायाचे ठसे दिसून आले असल्याची माहिती वनविभागाच्या परिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी माहिती दिली. यावेळी वनविभागाचे सचिन कांबळे,वन्यप्राण्याचे ङॉक्टर,शेतकरी राहुल काळे,आजूबाजूचे शेतकरी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धक्कादायक : लोखंडी कुऱ्हाडीने पत्नीवर घाव घातला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या