22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसोलापूरमाझे पाय चांगले राहू देत!

माझे पाय चांगले राहू देत!

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला. मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर ‘मानाचा वारकरी’ सन्मान मिळालेल्या जिजाबाई नवलेंनी माध्यामांशी संवाद साधला. नवले यांनी विठुरायाला आपले पाय चांगले असू दे असे साकडे घातले. पाय उत्तम राहल्यास निरंतर वारीला येता येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.यावेळी त्यांनी विठ्ठलकडे केलेले मागणे सध्या चर्चेत आले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मुरली भगवान नवले (५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केली. ‘मानाचा वारकरी’ सन्मान मिळालेले मुरली बबन नवले हे गेल्या ३०-३५ वर्षांपासून म्हणजेच लग्नाआधीपासून वारी करत आहेत. पण जिजाबाई यांचे हे वारीचे दुसरेच वर्ष आहे. त्यांचे पती मागील १२ वर्षांपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत. नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रूई येथील रहिवासी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून मुरली नवले हे १९८७ पासून न चुकता वारीला येतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या