30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeसोलापूरऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु - दत्तात्रय भरणे

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु – दत्तात्रय भरणे

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोना बाधितांवर उपचारसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणा-या प्रतिबंधात्मक उपाययोजने बाबत अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आमदार राम सातपुते, रणजितंिसह मोहिते पाटील, मुख्याधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदिप ढेले. मुख्यलेखाधिकारी अजय पवार, ,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी श्री.मोहिते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरणे बोलताना म्हणाले, जिल्ह्याला रेमडेसीवीर इंजेक्शन टप्प्याटप्याने मिळणार मिळणार असून जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील गरजूना प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यपध्दीतीप्रमाणे वितरण करावे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण स्तरापर्यंत उपचाराची सुविधा निर्माण कराव्यात. तसेच त्यांना आवश्यक ती औषधे वेळेत उपलब्ध करुन द्यावीत. जिल्ह्यात वापरानुसार लसीचा साठा उपलब्धत होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने आवश्यकतेनुसार लस उपलब्ध होणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता सबंधित यंत्रणेने घ्यावी.

यावेळी त्यांनी एकूण रुग्णसंख्या, सद्यस्थितीत असलेले अ‍ॅक्टीव्ह पेशंट, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनचा पुरवठा, नियमित होणारे टेंिस्टग आणि ट्रेंिसग आदींचा आढावा घेतला. नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे असे, असे आवाहनही श्री भरणे यांनी यावेळी केले.
माळशिरस तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व औषधसाठा मिळावा अशी मागणी आमदार राम सातपुते व रणजितंिसह मोहिते पाटील यांनी मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी स्वामी म्हणाले, ग्रामस्तरावरील ग्रामस्तरीय समित्या कार्यरत ठेवण्यात येणार असून, जादा लोकसंख्या असलेल्या गावांतील शाळा, मठ, धर्मशाळा आदी ठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असून, त्या गावांतील डॉक्टरांची उपचारासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी तालुक्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या, अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या, विविध रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रुग्णबेड संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, कोरोना तपासणी केंद्र याबाबतची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी यावेळी दिली.

पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार
कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंढरपूर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत माने, प्रशांत परिचारक, कल्याण काळे, भगिरथ भालके आदी उपस्थित होते. पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीत शंभर बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सुविधा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याचबरोबर डीव्हीपी उद्योग समूह तर्फे अभिजीत पाटील यांचे पन्नास बेड, पडळकर हॉस्पिटलमध्ये तीस आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तीस बेडची क्षमता वाढवली जाणार आहे.

मंगळावर प्राणवायूचे अस्तित्व

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या