सोलापूर : सोलापूर शहरात लॉकडाऊन अफवेंचा पेव उठला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी आज लॉकडाऊन संदर्भातील तारखा जाहीर करित असल्याचे सोशल मिडीओवर फेक मॅसेज फिरत आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला विचारले असता तुर्त तरी लॉकडाऊन करण्याचे विचाराधीन नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शहर जिल्हयातील कोरोना प्रतिबंध आणि उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने बैठका सुरु असून कामकाज करण्यात येत आहे. यापूर्वी शहर आणि जिल्हयातील बहूतांशी तालूके लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनमूळे कोरोना संसर्गाची साखळी तुटल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता. याच दरम्यानच्या काळात लॉकडाऊनमूळे शहरातील बाजारपेठांना फटका बसला होता. माकपसह विविध राजकीय पक्ष सामाजीक संघटनेनी लॉकडाऊन करू नये आशी मागणी लावून धरली होती. या सर्व पार्शवभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पून्हा सोलापूरात लॉकडाऊन होणार नाही. असे आश्वासन दिले होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सोलापूर शहरात पून्हा लॉकडाऊन होणार आहे आशी पोस्ट सोशल मिडीयावर फिरत आहे. ही निवळ आफवा आहे. कोणी ही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन रा.काँ. कार्यध्यक्ष संतोष पवार यांनी केले आहे.