23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसोलापूरमहात्मा फुले जनआरोग्य योजना रूग्णांसाठी ठरतेय मृगजळ

महात्मा फुले जनआरोग्य योजना रूग्णांसाठी ठरतेय मृगजळ

एकमत ऑनलाईन

रणजित जोशी सोलापूर :  सोलापूर शहर हे देशातील कोरोना बाधीत रूग्णांचा सर्वाधिक मृत्यूदर असलेले शहर आहे़ या शहरात कोरोना बाधीत रूग्णांनी ४ हजाराचा टप्पा गाठला आहे़ तर ४०० च्या दिशेने कोरोना बाधीतांच्या मृत्यूंची संख्या चालली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील उपचार मिळावेत या हेतूने शासनाने सर्वच कोरोना बाधीतावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचाराची सोय करून दिली़ मात्र ही योजना कोरोना रूग्णांसाठी मृगजळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर शहर व जिल्हा हा दिवसेंदिवस कोरोना बाधीत होत आहे़ वाढती रूग्ण संख्या व मृत्यू दर चिंतेचा विषय आहे़ प्रशासनाची या बाबीवर नियंत्रणासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू आहे़ कोरोना नियंत्रणासाठी दहा दिवसांचा कर्फ्यु ही लागू करण्यात आला आहे मात्र कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ४१ रूग्णालय असूनही शहरातील ७ व ग्रामीण मधील २ रूग्णालयामध्येच ही योजना सुरू आहे.

शहरात फक्त ५१४ रूग्णांना या योजनेचा लाभ मिळाला व योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळाले़ सोलापूर शहर जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या तसेच रूग्णालयामध्ये उपलब्ध असलेले आयसीयू बेड आदींची संख्या पाहता कोरोनाग्रस्त रूग्णांना मिळालेला लाभ हा गरज ढिगभर आणि लाभ नखभर अशी स्थिती आहे़ महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १० दिवस व्हेंटीलेटरचा उपयोग करून उपचार घेणा-या रूग्णांना ५० हजार रूपये मिळतात तर व्हेंटीलेटर नसलेल्या रूग्णांना २५ हजार रूपयांचा लाभ मिळतो. लक्षणे नसलेल्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

शासनाने जनतेच्या सोयीसाठी कोरोना बाधीतांचा समावेश महात्मा जन आरोग्य योजनेत केला असल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोलापूरात सांगितले़ मात्र एकूण रूग्ण संख्या व मिळालेला लाभ पाहता आरोग्य मंत्र्यांचा दावाही फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे.

Read More  कळमनुरीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या