27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरमाहेरी निघालेली आई ट्रॉलीखाली सापडून ठार; मुलगी जखमी

माहेरी निघालेली आई ट्रॉलीखाली सापडून ठार; मुलगी जखमी

एकमत ऑनलाईन

मोहोळ : सोलापूर-पुणे महामार्गावर यावलीजवळ स्कूटीला पाठीमागून ट्रेलरची जोराची धडक बसून आई ठार झाली, तर मुलगी गंभीर जखमी झाली . अपघातात मरण पावलेल्या आईचे नाव सविता पोपट चव्हाण आहे. हा अपघात शनिवार, दि. ११ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. त्या माहेरी अरणकडे निघालेल्या असताना हा अपघात झाला.

सविता पोपट चव्हाण (वय ३७, रा. सोलापूर) व हर्षदा पोपट चव्हाण (१८) या दोघी स्कूटी (एम. एच. १३/ डी.जी. ०४३९) वरून सोलापूरहून मोहोळमार्गे अरणकडे जात होत्या. दरम्यान, यावली गावाजवळ वाकडे वस्तीजवळून एक ट्रेलर (एम. एच. ४६ / बी. यू. ६०९६) हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. या ट्रॉलीची त्यांच्या स्कूटीला पाठीमागून जोराची धडक बसली. या अपघातात सविता चव्हाण यांच्या अंगावरून ट्रॉली गेल्याने त्या जागीच मयत झाल्या, तर त्यांची मुलगी हर्षदा चव्हाण ही गंभीर जखमी झाली. या प्रकरणी ट्रॉलीचालक दत्तात्रय भगवान वैद्य (रा. भालगाव, ता. बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या