36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeसोलापूरऔरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करा

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : औरंगाबाद शहराला असलेले औरंगजेबाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव सन्मानपूर्वक अर्पण करून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करावे या मागणीसाठी संभाजी आरमारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. सध्या राजकीय पक्षांनी नामांतरावरून जे राजकारण सुरु केले आहे त्याचा संघटनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.

‘जय भवानी – जय शिवाजी’ ‘औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी बापाला मारून सत्ता बळकावणा-या औरंगजेबाचे नाव ठेवायचे का वडिलांचे लोककल्याणकारी ंिहदवी स्वराज्य राखण्यासाठी बलिदान देणा-या संभाजी महाराजांचे याची समज सरकारने दाखवावी असे सांगत काँग्रेस नेत्यांना जर औरंगजेबाबद्दल प्रेम वाटत असेल तर त्यांनी आपल्या अपत्यांना औरंगजेबाचे नाव द्यावे असे सांगत नामांतराचा निर्णय आता शिवप्रेमी जनता करणार असे ठणकावून सांगितले. याप्रसंगी हातामध्ये फलक आणि भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. संविधानाने घोषित केलेल्या धर्मनिरपेक्ष भारतातील औरंगाबाद या शहराला असलेले कट्टर धर्मांधतेचे प्रतीक असलेले औरंगजेबाचे नाव हटवून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामाभिधान सन्मानपूर्वक अर्पण करून शंभूराजांच्या हिमालयापेक्षाही कैक पटीने उत्तुंग कामगिरीला मुजरा करावा असे सर्वच राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले.

देशी दारू दुकानासमोर महिलांचे ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या