27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरविवाहितेचा छळ,पतीसह चौघांवर गुन्हा

विवाहितेचा छळ,पतीसह चौघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

बार्शी : पती सक्षम नसल्याची माहिती असूनही त्याच्यासोबत लग्न लावून फसवणूक केली तर सासराही मनास लज्जास्पद असे वर्तन करून टेस्ट ट्यूब बेबीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने पोलिसात पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत अंकिता विवेक वाघमारे (वय २२, सध्या रा. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. पती विवेक विलास वाघमारे, सासरा विलास वाघमारे, सासू सुरेखा वाघमारे व नणंद विद्या वाघमारे (सर्व रा. जेऊर, ता. करमाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेचे आईवडील दारफळ (ता. माढा) येथे राहत असून तिचा विवाह विवेक वाघमारे याच्याशी १२ मार्च २०२० मध्ये झाला होता. त्यात दोन तोळ्यांच्या दागिन्यासह व इतर संसारोपयोगी साहित्य असे ५ लाख रुपये आईवडिलांनी खर्च केला होता. माहेरहून सासरी आल्यानंतर पती सतत मोबाइल पबजी गेम खेळत असे, रात्री पत्नी त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर माझ्या रूममध्ये का आली, म्हणून हाकलून देत असे. त्यामुळे याबाबत सासूलाही सांगितले.

त्यावर पती विक्षिप्त वागून मानसिक त्रास देऊ लागला. तसेच मूल होण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला देऊन त्यासाठी एक लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. त्यामुळे फिर्यादी या त्रासास कंटाळून बार्शीत आत्याकडे राहण्यास आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सारिका शेळके करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या