21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरविवाहितेचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा

विवाहितेचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कापडाच्या व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीला चापट मारत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अर्चना श्रीकृष्ण पामनाथ ( वय २२, रा. जुना विडी घरकुल ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अर्चना पामनाथ यांचे दोन वर्षांपूर्वी आरोपी पती श्रीकृष्ण मोगलप्पा पामनाथ याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी फिर्यादीला चांगले नांदवले. त्यानंतर मात्र कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी तुझ्या
वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये तरच तुला व्यवस्थित सांभाळतो, असे म्हणत पतीने व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फिर्यादीला त्रास दिला. त्यानंतर तुला सांगूनही तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेऊन आले नाही असे म्हणत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

अशा आशयाची फिर्याद अर्चना यांनी दिली आहे. याप्रकरणी अर्चना यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती श्रीकृष्ण पामनाथ, सासू लक्ष्मीबाई मोगलप्पा पामनाथ, सासरा मोगलप्पा पामनाथ, नणंद ललिता नरेश गुंजेटी (सर्व रा. जुना विडी घरकुल ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोना चव्हाण करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या