23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeसोलापूरविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तळे हिप्परगा परिसरातील मंठाळकर वस्तीत राहणा-या अजय शिवाजी चौगुले (२४) या विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

काल शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह छताच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत अजय चौगुले हा जेसीबी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याची पत्नी दोन महिन्यापूर्वी माहेरी गेली होती. घरात कोणी नसताना त्यांनी हा प्रकार केला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून हवालदार गुंड पुढील तपास करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या