28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसोलापूरकाश्मीर खो-यात सेवा बजावताना मंगळवेढ्याच्या सुपुत्राला वीरमरण

काश्मीर खो-यात सेवा बजावताना मंगळवेढ्याच्या सुपुत्राला वीरमरण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : काश्मीर खो-यात श्रीनगर येथे सेवा बजावताना सोलापूर जिह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंदी येथील जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे (वय ३४) यांच्या अचानक छातीत दुखू लागले असल्याने सहका-यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी रात्री १ वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव मूळ गावी हुलजंती गावात सोमवारी आणण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणा-या हुलजंती येथील नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे जवळपास ८ वर्षापूर्वी भारतीय सेवेत रुजू झाले आहेत. ते कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात गेले तीन महिने ते हुलजंती गावी सुट्टीवर आले होते. गेल्या १ महिन्यापूर्वीच ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. मात्र शनिवारी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व गावावर शोककळा पसरली आहे.

शहीद नागप्पा म्हेत्रे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन भाऊ असा परिवार असून त्यांच्या वडिलांचे पाच वर्षापूर्वीच निधन झाले आहे. शेतकरी कुटुंबातील नागप्पा यांना केवळ चार एकर जमीन आहे. प्राथमिक शिक्षण हुलजंती तर महाविद्यालयीन शिक्षण बालाजीनगर येथील आश्रमशाळा येथे झाले. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून आई वडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण करून त्यास भारतीय सैन्य दलात भरती केले होते.

श्रीनगर येथे सेवा बजावत असलेले जवान नागप्पा ाहेत्रे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचे रहिवाशी आहेत. नागप्पा म्हेत्रे यांचे मोठे भाऊ म्हाळप्पा म्हेत्रे यांना रविवारी रात्री २.३० वाजता फोन आला आणि नागप्पा म्हेत्रे यांचे निधन झाल्याची माहिती श्रीनगर येथील सैन्य दलाच्या अधिका-यांनी दिली.

Read More  जम्मू-काश्मीरमधील लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या