सोलापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कौटुंबिक न्यायालय, असोसिएशन, सोलापूर बार विधिज्ञ कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त यांनी ‘मी…. स्वच्छंद’ एक हृदय सोहळा छत्रपती रंगभवन येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यमने झाली. या कार्यक्रमामध्ये महिलांना मी…. स्वच्छंद स्त्रीची प्रतिमा व गुलाबाचे पुष्प देऊन डॉ. औटी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर, दिवाणी न्यायाधीश संघ एस. एन. रतकंठवार, एन. एम. बिरादार, अस्मिता गायकवाड यांनी आजच्या सामाजिक स्थितीतील स्त्री स्वातंत्र्याची दिशा या विषयावर भाष्य केले. तर बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी महिलांनी आपल्या जीवनात जास्तीत जास्त प्रगती केली पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, केगाव प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर तसेच न्यायिक अधिकारी, वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सचिव नरेंद्र जोशी यांनी केले तर अॅड. तुपडे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राधिकरणाचे अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे यांनी परिश्रम घेतले. सुनीता चोपडे, सचिन वडतिले, विजय माळवदकर, काजल चव्हाण, बाजीराव जाधवर, रहीम शेख, विजय शिंदे, युवराज मायनाळे तसेच कौटुंबिक न्यायालय विधिज्ञ संघाचे अध्यक्ष नितीन स्वामी, जान्हवी कुलकर्णी उपस्थीत होते.