24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरपंढरपुरात वृक्ष लागवड योजनेत १ कोटी २५ लाखांचा अपहार

पंढरपुरात वृक्ष लागवड योजनेत १ कोटी २५ लाखांचा अपहार

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : महाराष्ट्र शासनाने सन २०१९ २० मध्ये राबविलेल्या वृक्ष लागवडीमध्ये पंढरपूर तालुक्यात समाजिक वनीकरण परिक्षेत्र विभागाच्या तीन कर्मचान्यांसह ८ जणांनी बनावट दस्तावेज तयार करून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावावर १ कोटी २५ लाख रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल बोगस चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पंढरपूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. कामत यांनी पंढरपूर पोलिसांना दिले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने सन २०१९-२० मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली होती. त्यानुसार पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने पंढरपूर समाजिक वनीकरण विभागामार्फत शहर व तालुक्यातील प्रमुख रस्ते, मैदाने शासकीय कार्यालय परिसरात दुतर्फा वृक्षलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ही योजना शासनाच्या नियमाप्रमाणे न राबविता तत्कालीन वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर आहिरे, वनमजूर अंबण्णा जेऊरे यांनी संगनमत करून अनेक ठिकाणी अर्धवट झाडे लावली. या योजनेवर मजुरीसाठी कधीही उपस्थित नसणारे प्रवीण जाधव, जयशिंग नागणे, अभिजित गायकवाड, प्रताप गायकवाड, अनिल गायकवाड, राणी गायकवाड, मयूर गायकवाड, वनिता दनवले, स्वाती दणवले, लक्ष्मण साळवी यांना बनावट मजूर दाखवून त्यांच्या नावे बनावट दस्त, खोटी कागदपत्रे तयार करून व्हाऊचरवर त्यांच्या सह्या न घेता व्हाऊचर नंबर ३२, वर बोगस सही, अंगठे करून १ कोटी २५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी दादासाहेब चव्हाण यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

दादासाहेब चव्हाण यांनी याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्याद घेतली नाही म्हणून १ जुलै २०२१ रोजी पोस्टाने फिर्याद दिली. त्यानंतर ही अपहाराचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे २७ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादीने पंढरपूर न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. कामत यांनी याप्रकरणी वनविभागाच्या तीन कर्मचाऱ्यांसह ८ जणांवर कलम १५६ अंतर्गत गुन्हा दाखल करून कलम १२९, ४०६, ४२०, ४६३, ४६४, ४६५, व पर्यावरण कलम कायदा १५ व १७ नुसार अहवाल करून अहवाल सादर करण्याचे आदेश पंढरपूर पोलिसांना दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या