24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरमित्राला काठीने झोडपले; तिघांवर गुन्हा

मित्राला काठीने झोडपले; तिघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : किरकोळ कारणावरून एकाला काठीने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, दि. १४ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रामपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली.

युनूस अलीभाई बागवान (२९, रा. रामपूर, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हैदरअली महिबूब बागवान, महम्मद महिबूब बागवान, हनीफ महम्मद बागवान या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी घराच्या बाहेर बसले असताना हैदर महिबूब बागवान हा घराच्या कट्ट्यावर बसून अश्लील शिवीगाळ करीत होता. तेव्हा फिर्यादीने त्याला जाब विचारला. मात्र, हैदरने फिर्यादीला अंगावर धावून जात ढकलून दिले. तसेच घरासमोर पडलेल्या लाकडाने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले. हैदरच्या सोबत असलेल्या महम्मद बागवान याने युनुसच्या अंगावर, पाठीवर लाकडाने मारहाण केली तर हनिफ बागवान याने शिवीगाळ करून व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक फौजदार राठोड करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या